IMPIMP

Pune Crime | एक्सगर्लफ्रेंडचा मोबाईल चोरुन त्यावरुन अश्लिल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अनेक मुलींशी संबंध असल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडून टाकले. तेव्हा त्याने तिचा मोबाईल चोरला (Mobile Stolen). त्यावर कॉल करुन चारित्र्याचा (character) संशय निर्माण केला. तिचे नकळत काढलेले फोटो, व्हिडिओ दाखवून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी सुहास राधाकृष्ण नवले Suhas Radhakrishna Navale (वय 36, रा. शंकर महाराज सोसायटी, गंगाधाम) याला कोंढवा पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. याबाबत एन आय बी एम रोडवर (NIBM Road) राहणार्‍या एका 35 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखी असून सुहास नवले याचे इतर मुलींसोबत संबंध असल्याचे समजल्यावर फिर्यादी यांनी त्याच्याशी बोलणे बंद केले. त्याचा नंबरही ब्लॉक केला. फिर्यादी या 7 जून रोजी सकाळी साडेआठ वाजता मुलीला शाळेत सोडून घरी परत जात होत्या. त्यावेळी उंड्रीतील बीबीसी हॉटेलसमोरील (BBC Hotel Undri) रस्त्यावर नवले यांनी त्यांना अडविले.

तुझ्याशी बोलायचे आहे, असे तो म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन त्या जाऊ लागल्या. तेव्हा त्याने जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन नेला.
या फोनवर नवले याने वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल करुन फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेतला.
त्यांचे अश्लिल फोटो (Pornographic Photo) व व्हिडिओ (Videos) नकळत काढून ते फिर्यादीला दाखविले.
तिच्या नातेवाईक आणि सोशल मीडियावर हे फोटो व व्हिडिओ पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गपाट (PSI Gapat) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Ex-girlfriend’s mobile phone stolen and pornographic photos, videos threatened to go viral on social media

हे देखील वाचा :

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

Indian Railways | रेल्वेने या मोठ्या बातमीचे केले खंडन, म्हटले – ‘विश्वास ठेवू नका, अन्यथा होईल पश्चाताप’

Maharashtra Crime | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची 6 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, प्रचंड खळबळ

Related Posts