IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील CISF जवान आणि सहकारी महिलेची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

by nagesh
 Pune Lohegaon International Airport | summer-schedule-of-pune-lohegaon-international-airport-will-start-from-march-26

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील Central Industrial Security Force (CISF) जवान व महिला कॉंस्टेबल यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. (Accidental Death Of CISF Jawan And CISF Lady Constable In Pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अस्मिता दास (वय ३०, मुळ रा. ओडिशा) आणि संजय कुमार (वय ३०, मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघेही लोहगावातील गुरुद्वारा कॉलनीत रहात होते. (Gurudwara Colony, Lohegaon, Pune)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता दास आणि संजय कुमार दोघेही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नियुक्तीला होते.
पोलीस काँस्टेबल म्हणून त्यांची विमानतळावर नेमणूक करण्यात आली होती (Pune Crime).
दोघेही वेगवेगळ्या घरात रहात होते.
सोमवारी अस्मिता दास (CISF Constable Asmita Das) हिची मैत्रिणी तिला फोन करीत होती.
परंतु, ती उचलत नसल्याने ती दास हिच्या घरी आली़ तरीही तिने दार न उघडल्याने पोलिसांना बोलावून दार उघडले असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

त्याचप्रमाणे संजय कुमार (CISF Jawan Sanjay Kumar) यांच्या घरातून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे त्याच्या शेजारच्यांनी कळविल्यानंतर दरवाजा उघडून आत पाहिले असता संजय कुमार यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
दोघांनी एकाच वेळी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही.
विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) अकस्मात मृत्यु (Accidental Death In Pune) अशी नोंद करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | Exciting CISF jawan and female colleague (CISF Lady Constable) commit suicide at different places at Lohgaon airport in Pune

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेला कामावरुन काढून टाकल्याने झालेली तक्रार मिटविण्यासाठी मुलाने मालकाकडे मागितली 10 लाखांची खंडणी; कात्रज परिसरातील घटना

Pune Crime | पर्वती पायथा येथे कोयते हवेत नाचवत दहशत ! गुन्हेगारांच्या पुढच्या पिढीमध्ये ‘गँगवॉर’? 12 हून अधिक वाहनांची तोडफोड

Modi Government | मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा ! 14 पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ; कोणत्या पिकाला किती हमीभाव ? जाणून घ्या

Related Posts