IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! पाणीपुरीच्या वादातून पुण्यात पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

by nagesh
Builder Paras Porwal Suicide | mumbai famous builder paras porwal ended his life by jumping from the building

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पाणीपुरी (Pani Puri) न विचारता आणल्याच्या वादातून पत्नीने आत्महत्या (commits suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) पती विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन पतीला अटक (husband arrest) केली आहे. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे Gahininath Sarvade (वय-33) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) असून त्यांचा विवाह 2019 मध्ये प्रतिक्षासोबत (मुळ रा. बीड) झाला होता.
त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून तो पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर प्रतिक्षा सासरी राहत होती. यावरून त्यांच्यात वाद होत होते.
काही दिवसांपूर्वीच गहिनाथ याने पत्नीला पुण्यात आणले होते.
ते दोघेही आंबेगाव पठार येथे राहत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

घटनेच्या दोन दिवसापूर्वी गहिनीनाथ याने ऑफिसवरून येताना पाणीपुरीचे पार्सल आणले होते.
त्यावेळी मला न विचारता पाणीपरी आणल्याच्या रागातून प्रतिक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.
पाणीपुरी आणण्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. यानंतर पतीने कामावर जाताना डबा नेण्यास नकार दिला. यातूनच प्रतिक्षाने विषारी औषध प्राशन केले.
तिला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, शनिवारी (दि.28) दुपारी तीनच्या सुमारास प्रतिक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रतिक्षाचे वडील प्रकाश प्रभाकर पिसे Prakash Prabhakar Pise (वय-55 रा. सरकारी दवाखान्यामागे, बीड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गहिनीनाथ अंबादास सरवदे याच्या विरोधात तक्रार दिली.
प्रकाश पिसे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती गहिनीनाथ सरवदे याला अटक केली आहे.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Exciting! Wife commits suicide in Panipuri dispute, husband arrested

हे देखील वाचा :

Ration Card Rules | आता दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार; रेशन कार्डाच्या नियमांत बदल

Modi Government | जर घरबसल्या दरमहिना पाहिजेत 5000 रुपये, तर ‘इथं’ करा गुंतवणूक; जाणून घ्या मोदी सरकारची योजना

PhonePe | ‘फोनपे’वर खरेदी करता येईल इन्श्युरन्स पॉलिसी, 30 कोटी लोकांना होईल फायदा; जाणून घ्या

Related Posts