IMPIMP

Pune Crime | लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ, पुण्याच्या हडपसरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह सासू-सासऱ्यांवर FIR

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | काही समाजामध्ये आजही विवाहापूर्वी तरुणीची कौमार्य चाचणी (Virginity Test) करण्याची पद्धत आहे. मात्र, अशा प्रकारच्या चाचणीला कायद्याने बंदी (Prohibited by Law) असताना देखील चाचणी केली जाते. उच्चशिक्षित (Highly Educated) तरुणीला ही चाचणी करण्यास भाग पडले जाते. असाच एक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुण्यातील (Pune Crime) एका उच्चशिक्षित पतीने कौमार्यभंग केल्याचा ठपका ठेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत एका 28 वर्षीय विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन पतीसह अमेरिकेत राहणाऱ्या सासू सासऱ्यांवर IPC 498 (A), 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार अमेरिकेतील (United States) टेक्सास (Texas), कर्नाटक (Karnataka) आणि फुरसुंगीत (Fursungi) जानेवारी ते 26 डिसेंबर 2021 दरम्यान घडला.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला उच्चशिक्षित असून पुण्यातीलच एका नामांकित कंपनीत काम करते. या महिलेचा पती देखील उच्चशिक्षित असून तो सॉफ्टवेअर इंजीनियर (Software Engineer) आहे. सध्या तो अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत काम करतो. फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर ते अमेरिकेतील टेक्सास येथे गेले होते. फिर्यादीच्या पतीने लग्न झाल्यानंतर फिर्यादी सोबत शारिरीक संबंध केल्यानंतर तुला ब्लडिंग का झाले नाही, असे विचारले. लग्नाचे अगोदर तुझे कोणाबरोबर शारिरीक संबंध (Immoral Relationship) होते का ? अशी सतत विचारणा करुन भांडण काढून फिर्यादीचा छळ केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान ते अमेरिकेतून कर्नाटकात आले. सध्या ते फुरसुंगीत राहत आहे.
या काळात फिर्यादीच्या चारित्र्याचा संशय घेऊन भांडणे काढून मारहाण (Beating) करुन शिवीगाळ करुन सतत घटस्फोट (Divorce) दे म्हणून धमकी दिली.
तर सासू सासर्‍यांनी फिर्यादीचा मानसिक व शारीरीक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
महिलेच्या तक्रारीवरुन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक पूनम लाड (Police Naik Poonam Lad) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | FIR against software engineer husband and mother in law in Hadapsar of Pune for Virginity Test

हे देखील वाचा :

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने काळ्या मोनोकिनीमध्ये दाखवला हॉट अवतार, फोटो तुफान व्हायरल

Gaspard Ulliel Death | अभिनेता ‘गॅस्पर्ड उलिल’ यांचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन

Pune Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांचा परराज्यातील अट्टल दरोडेखोरांसोबत ‘थरार’, 6 आरोपीं ताब्यात; एक पोलीस जखमी

Related Posts