IMPIMP

Pune Crime | वार्षिक 36 % परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांची 11 कोटीची फसवणूक, पुण्यातील झेन मनी प्लॅन्टच्या संचालकांसह 6 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | FIR Against Zen Money Plant Directors In Koregaon Park Police Station Pune For Cheating Investors Of Rs 11 Crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | गुंतविलेल्या रकमेवर (Investment Amount) वार्षिक 36 टक्के परतावा (Return) देण्याचे आमिष (Lure) दाखवून अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील झेन मनी प्लांन्टमध्ये (Zen Money Plant) हा प्रकार घडला असून कंपनीने अनेक लोकांची तब्बल 11 कोटी 26 लाख 37 हजार 124 रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली आहे. याप्रकरणी झेन मनी प्लॅन्टच्या 6 संचालकांविरुद्ध (Zen Money Plant Director) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (FIR Against Zen Money Plant Directors In Koregaon Park Police Station Pune For Cheating Investors Of Rs 11 Crore)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

झेन मनी प्लॅन्टचे संचालक नटराजन बालसुब्रमण्यम (Natarajan Balasubramaniam), शेरॉन नदान (Sharon Nadan),
मुकेश गाबा (Mukesh Gaba), पुनम भालेराव (Poonam Bhalerao), हिरेन वासानी (Hiren Vasani), नाझिया तांबोळी (Nazia Tamboli) यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संरक्षण अधिनियम (Maharashtra Depositors Financial Protection Act) 1944 चे कलम 3 व 4 नुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरेशकुमार अप्पलराजु वर्मा Sureshkumar Appalraju Verma (वय – 43) यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 2 जुलै 2020 ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत झेन मनी प्लॅन्टच्या ब्लोसम बोलेवाड, लेन नं. 7 कोरेगाव पार्क येथील कार्यालयात घडला आहे.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा Economic offences wing, Pune (EoW Pune) करीत आहेत. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेन मनी प्लॅन्ट चे संचालक नटराजन बालसुब्रमण्यम आणि शेरॉन नदान यांनी इतर आरोपींच्या मदतीने संगनमत करुन परिचित गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले.
तसेच इतर गुंतवणुकदारांना (Investors) गुंतवलेल्या रकमेवर वार्षीक 36 टक्के व मासिक 2,3,4 व 5 टक्के असा परतावा देण्याचे आमिष दाखवले.
याशिवाय गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या परताव्याची रक्कम 18 महिन्यात परत देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या इतर परिचित लोकांना गुंतवणूक केल्यानंतर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (Notarized Affidavit), इन्व्हेस्टमेंट रिसीप्ट (Investment Receipt), अकाउंट ओपनिंग फॉर्म (Account Opening Form), सिक्युरिटी चेक (Security Check) अशी हमीपत्रे दिली.
लोकांचा आरोपींवर विश्वास बसल्याने त्यांनी झेन मनी प्लॅन्टमध्ये गुंतवणूक केली.
मात्र, गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा अथवा मुद्दल न देता आरोपींना 11 कोटी 26 लाख 37 हजार 127 रुपयांची फसवणूक करुन ही रक्कम इतर कामासाठी वापरली.
फिर्यादी यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार अर्ज केला.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कोळी (PSI Koli) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR Against Zen Money Plant Directors In Koregaon Park Police Station Pune For Cheating Investors Of Rs 11 Crore

हे देखील वाचा :

Petrol Diesel Prices Increased In Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ; मागील वेळेपेक्षा तिप्पट वेगाने वाढताहेत किंमती

Pune Crime | शिवाजीनगर परिसरातील शाळेत घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये बलात्कार करणारा नराधम अटकेत

Pune Crime | कोथरूडमध्ये 13 वर्षाच्या विशेष मुलाचा खून; खूनाचे गूढ अद्याप गुलदस्त्यात, एकाला अटक

Related Posts