IMPIMP

Pune Crime | कमिन्स इंडियाच्या HR सह तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर FIR दाखल

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | ग्रुप लोन स्कीम अंतर्गत काढलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड न करता कामावरून काढून टाकलेल्या कर्जदाराच्या रकमेमधूनही कर्जाची वसुली न करता जामीनदारांना कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडण्यात आले. याप्रकरणी जमीनदारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) कमिन्स इंडिया लिमिटेडच्या (cummins india limited) HR सह युनियनच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा (Cheating) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अजित चंद्रकांत शेलार (रा. आनंदनगर), एचआर प्रकाश बिमलखेडकर,  श्रीकांत रघुनाथ दळवी,
प्रवीण सहदेव कोळकर, सुधीर मच्छिंद्र राऊत, विलास आप्पाजी दसवडकर, गणेश ज्ञानेश्वर गाडीवान,
नवनाथ ज्ञानेश्वर नलावडे, श्रीकृष्ण भगवान नेमाडे, सुनील दत्तात्रय पवार, नितीन शामराव चव्हाण,
सचिन विठ्ठलराव पायगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी प्रमोद खंडेराव पाटील (वय 48 रा. राजयोग सोसायटी, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटे कमिन्समध्ये (cummins india limited) नोकरीस आहेत.
त्यांच्या कंपनीमध्ये किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन (Kirloskar Cummins Employees Union) ही संघटना आहे.
कर्मचाऱ्यांसाठी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Saraswat Co-operative Bank) सहकार्याने ग्रुप लोन स्कीम सुरू आहे.
कामगारांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकविल्यास त्याच्या वेतनातून रक्कम काढून बँकेला देणार अशी लिखित हमी कंपनीने बँकेला दिलेली होती.

कामगारांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण वसुलीची जबाबदारी युनीयनने घेतलेली होती.
कर्जदार अजित शेलार यांनी सारस्वत बँकेकडून दोन लाख रुपयांचे ग्रुप लोन स्कीम अंतर्गत कर्ज घेतले होते. त्याला पाटे आणि साक्षीदार विलास बडदे हे दोघेजण जामीनदार आहेत.
2005 साली युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शेलार यांना कंपनीतून काढून टाकले.
त्यानंतर कंपनी मधून मिळणाऱ्या ग्रॅज्युटी तसेच अन्य रकमेमधून बँकेचे ग्रुप लोन कर्ज कट करण्यात आले नाही.
तसेच सारस्वत बँकेच्या कर्ज खात्यावर जमा देखील करण्यात आले नाही.
त्यामुळे हे कर्ज थकीत दिसले. आरोपींनी जमीनदारांना त्यांच्या खात्यामधून कर्जाची रक्कम भरण्यास भाग पाडले.
त्यानुसार, त्यांच्या खात्यामधून रक्कमही परतफेड स्वरूपात घेण्यात आली.
या प्रकारे आरोपींनी विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा (Cheating Case) दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime | FIR filed against the then office bearers along with HR of Cummins India in kothrud police station

हे देखील वाचा :

Netherland Cucumber | काकडीची लागवड करून कमावले 8 लाख; जाणून घ्या स्टोरी

MHT-CET 2021 | एमएचटी CET परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु – मंत्री उदय सामंत

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार नाहीत

Related Posts