IMPIMP

Pune Crime | विधवा मुलीशी मुलाचे लग्न करण्याची जबरदस्ती; धमकाविणार्‍या मार्केटयार्डातील सावकाराला अटक, कोथरूडमधील व्यावसायिकाची फिर्याद

by nagesh
Pune Crime | Due to a property dispute brothers and sisters got together and killed a brother by pushing him into a canal; It was revealed after four years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | व्यवसायासाठी घेतलेले १० लाख रुपयांचे कर्ज (Loan For Business) व्याजासह फेडल्यानंतरही आणखी व्याजाची मागणी करुन समाजातील विधवा मुलीशी (Widow Woman) मुलाचे लग्न लाव, नाही तर मारहाण करण्याची धमकी देणार्‍या सावकाराला (Money Lender In Pune) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनिल जयभगवान बन्सल Anil Jaibhagwan Bansal (वय ५३, रा. हरीगंगा सोसायटी, मार्केटयार्ड) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. अनिल बन्सल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोथरुडमधील ५४ वर्षाच्या व्यवसायिकाने (Businessman In Kothrud) मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद Marketyard Police Station (गु. रजि. नं. ९७/२२) दिली आहे. हा प्रकार २४ जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बन्सल यांचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे.
फिर्यादी यांनी बन्सल याच्या जयभगवान शिवकुकमार अग्रवाल या मार्केटयार्ड येथील ऑफिसवर गेले होते.
त्यांनी मुलाच्या व्यवसायासाठी पेपर कप मशीन खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये दरमहा २२ हजार रुपये व्याजाने घेतले होते.
त्यापोटी बन्सल यांनी फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या कोथरुड येथील फ्लॅटची मुळ कागदपत्रे व कोरा चेक घेऊन करारनामा केला होता.
फिर्यादी यांनी मुद्दल व व्याज असे एकूण १२ लाख ९३ हजार रुपये परत केले.
तरीही त्यांची कागदपत्रे व चेक परत केला नाही. फिर्यादी यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने आणखी व्याजाची रक्कम मागितली.
त्यासाठी फिर्यादी यांनी वेळ मागितल्याने आरोपींनी फिर्यादी यांना त्यांचे समाजातील विधवा मुलीशी फिर्यादी यांचे मुलाचे लग्न लावून दे, असे सांगितले. नाही तर फ्लॅटची कागदपत्रे देणार नाही, असे बोलले. फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली आहे. फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर बन्सल याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.

 
Web Title :- Pune Crime | Forcing a boy to marry a widow woman Arrest of moneylender in threatening market yard complaint of businessman in Kothrud

Related Posts