IMPIMP

Pune Crime | दरमहा २४ टक्के परतावाचा मोह पडला साडेचार कोटींना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

by nagesh
Pune Crime | Agents same fraud companies but different; In the name of holiday home abroad, the young man was raped

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शेअर मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणुक (Investments) केल्यास अधिक फायदा मिळतो,
असे भासवून लोकांची फसवणूक (Fraud Case) करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच एका तरुणाला शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading)
गुंतवणुक करण्यास दरमहा २४ टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवून त्याची ४ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक (Pune Crime) केल्याचा
प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सनसिटी रोडला राहणार्‍या एका ४० वर्षाच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित आप्पासो वठार Abhijit Appaso Vathar (वय ४०, रा. ओकवुडस हिल सोसायटी, बाणेर – Baner) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १५ जुलै २०२० ते ७ जानेवारी २०२१ दरम्यान घडला. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित वठार याची ए आर एन्टरप्राजेस (AR Enterprises) ही कंपनी आहे.
त्याने फिर्यादी यांना फॉरेक्स ट्रेडिंग (Forex Trading), शेअर ट्रेडिंग आणि रिरायझिंग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (Rerising Construction Pvt. Ltd.) यामध्ये गुंतवणुक केल्यास २४ टक्के दरमहा परतावा देईल असे सांगितले.
तसा फिर्यादी सोबत करारनामा करुन जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यावर फिर्यादी यांनी एकूण ५ कोटी रुपये गुंतविले.
सुरुवातीला आरोपीने विश्वास संपादन करण्याकरीता ६२ लाख ५० हजार रुपये परतावा दिला.
त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी मागणी केल्यानंतरही कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची ४ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली.
सहायक पोलीस आयुक्त शिरगावंकर (Assistant Commissioner of Police Shirgaonkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Four and a half crores were cheated with the lure of investing in share trading with the temptation of 24 percent returns per month

हे देखील वाचा :

Eye Care Tips | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी घरगुती पद्धत, ही फळे आणि ड्राय फ्रूट्समुळे होईल जबरदस्त फायदा

Pune Crime | जर्मन शेर्फड कुत्रा चावल्याने मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; बाणेरमधील आलिशान सोसायटीतील घटना

RBI Repo Rate Hike | रेपो रेटमध्ये 4 महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, दास यांच्या घोषणेनंतर 5.40 टक्क्यांवर पोहचला; RBI च्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

Related Posts