IMPIMP

Pune Crime | ब्लॅक मनी व्हाईट करु देण्याच्या बहाण्याने 1 कोटीची फसवणुक करणार्‍या चौघांना अटक

by nagesh
Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचे अ‍ॅप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या BYJU थिंग अँड लर्न लिमिटेड (BYJU’s Think and Learn PVt Ltd) या कंपनीच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक (Pune Crime) केल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील टोळीचा खडक पोलिसांनी (Khadak Police) पर्दाफाश केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth) पानघंटी चौकात 10 ऑक्टोबर 2020 रोजी घडला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रकाश आनंद माने Prakash Anand Mane (रा. वरळी, मुंबई), विनोद दिपक परदेशी
Vinod Deepak Pardeshi (रा. आदर्शनगर, धनकवडी, पुणे), नयन प्रवीणभाई बारोट
Nayan Praveenbhai Barot (रा. कस्तुरे चौक, पुणे), समीर भास्कर वझे Sameer Bhaskar Vaze (रा. गोवा) अशी अटक (Arrest) करण्यात आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखील वसंत कदम
Nikhil Vasant Kadam (वय-35 रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी खडक पोलिसांकडे (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. आरोपींकडे फसवणुक (Fraud) केलेल्या रक्कमे बाबत तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल कदम यांचा स्टेशनरी विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. कदम यांच्या घराजवळ राहणारा गणेश हुशार (Ganesh Hushar) याने अटक आरोपी प्रकाश माने याच्यासोबत ओळख करुन दिली.
याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपी माने याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना
ऑनलाईन शिक्षण (Online learning) देणारे अॅप बायजुथिंग अँड लर्न या कंपनीने बायजुस
या नावाने कंपनी काढली आहे. ही कंपनी मुळची बंगलोरची आहे.
असे असताना आरोपीने फिर्यादी यांना पश्चिम बंगाल येथे बायजुस थिंग अँड लर्न ही कंपनी असून
त्या कंपनीत 1 कोटी रुपये गुंतवणुक केल्यास कंपनी 1 कोटी 30 लाख रुपये देते असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपीला 1 कोटी रुपये रोख दिले.
त्यानंतर एक वर्ष झाले तरी ही रक्कम परत न केल्याने निखील कदम यांनी खडक पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या गुन्ह्याचा तपास करुन खडक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती खुप मोठी असून त्यांची राज्यीय आणि आंतरराज्यीय टोळी (Interstate gang) असल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच या गुन्ह्यात दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी प्रकाश माने हा मुंबई येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
त्याच्यावर वरळी, एन.एम. जोशी मार्ग, दादर मुंबई येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner of Police Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 डॉ. प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranware) यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Shrihari Bhairat),
पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे (Harshvardhan Gade), राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ,
राहुल घाडगे, अजीज बेग, फहिम सैय्यद, संदिप पाटील, रवी लोखंडे, समीर शेख, राहुल मोरे,
विशाल जाधव, अर्जुन कुडाळकर, हिम्मत होळकर, कल्याण बोराडे, सागर घाडगे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Four arrested for swindling Rs 1 crore under the pretext of allowing black money to be laundered

हे देखील वाचा :

PM Modi’s Birthday | ‘PM मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम; 2 कोटींचा आकडा गाठला

PMC 7th pay Commission | 7 व्या वेतन आयोगावरून सर्वसाधारण सभेत ‘नरम नोकझोंक’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 171 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts