IMPIMP

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

by nagesh
Pune Crime | Fraud case! Alnesh Somji of M. G. Enterprises sent to Yerawada Jail; Wife Dimple Somji's bail hearing on Monday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एन्टप्रायजेसच्या (M.G. Enterprises) अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या (Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाने (Anti extortion Cell) दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) ताब्यात घेतले. अलनेश सोमजी याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज (गुरुवार) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अलनेश सोमजी याच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे. तर पत्नी डिम्पल सोमजी सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असून तिने जामिनासाठी अर्ज (Application bail) केला आहे. (Pune Crime)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अखिलेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक पतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते. आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout notice) जारी केली होती.

दिल्ली येथून पुण्यात (Pune Crime) आणल्यानंतर सोमजी दाम्पत्याला शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अलनेश याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली होती. तर डिम्पल सोमजी हिला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. डिम्मपल सोमजी हिने आज जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला असून त्यावर उद्या किंवा परवा सुनावणी होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली. (Pune Crime)

Web Title : Pune Crime | Fraud case! M. G. Enterprise’s Alnesh Somji’s police custody extended while wife Dimple Somji’s application for bail

हे देखील वाचा :

PF Balance | इंटरनेट आणि मोबाइल डेटा न वापरता चुटकीत जाणुन घ्या आपला PF बॅलन्स, अतिशय सोपी आहे ‘ही’ पद्धत

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Related Posts