IMPIMP

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या विरोधात कोण बोलतो’ असे म्हणत टोळक्याचा राडा, कोयत्याने तरुणावर वार

by nagesh
Pune Crime | A youth who was waiting to fetch his brother from school was attacked by a gang with a sword

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आम्ही इथले भाई आहे, आमच्या विरोधात कोण बोलतो असे म्हणत दोघांनी दत्तवाडी येथील पानमळा (Panmala Sinhagad Road) परिसरात दहशत माजवली. आरोपींनी परिसरातील घरांवर आणि दुकांनांवर लाथा मारुन दहशत निर्माण करत एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जगदीश मिनी मार्केटच्या (Pune Crime) समोर घडली.

गणेश ढावरे Ganesh Dhaware (वय – 18 रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा पानमळा परिसरात राहण्यास आहे. दुपारीच्या सुमारास घरी असताना दोन आरोपी आले. त्यांनी आम्ही इथले भाई आहोत, आमच्या विरोधात कोण बोलतो असे म्हणत घरांच्या दारावर तसेच दुकानांवर लाथा मारून दहशत माजवली. त्यावेळी गणेशचा भाऊ अमर ढावरे याने इथे दंगा करु नको घरी जा असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी हातातील कोयत्याने फिर्यादी गणेश याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Gang riot in Panmala area in Pune attack on youth

हे देखील वाचा :

Pune Crime | बालेवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Ajit Pawar | मंत्रिमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार का रखडला, दीपक केसरकर यांनी सांगितलं कारण

Smelly Underarms | घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात का? या उपायांद्वारे होईल सुटका

Related Posts