IMPIMP

Pune Crime | अप्पा लोंढेच्या नावाने गुंडाची दहशत ! पाणीपुरीचे पैसे मागितल्याने चालकाला मारहाण, स्टॉलची केली तोडफोड

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कुख्यात गुंड अप्पा लोंढे (Appa Londhe) याचा टोळीयुद्धातून खून झाल्यानंतरही त्याच्या नावाने स्थानिक गुंड आपली दहशत पसरवित असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणीपुरी खाल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चालकाला मारहाण करुन स्टॉलची तोडफोड करुन तिघांनी गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने चोरुन नेले याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अनिल सुरेश राठोड Anil Suresh Rathod (वय ३२, रा. बगाडे मळा, ऊरुळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४२४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव राजाभाऊ तरंगे (वय १९, रा. दत्तवाडी), तुषार अनिल अडागळे (वय १८), प्रताप बाळु लोंढे (वय २१, रा. गोळेवस्ती, ऊरुळी कांचन) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला असून वैभव व प्रताप यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ऊरुळी कांचनमधील दत्तवाडी येथील सरस्वती आर्टसचे समोर शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल राठोड यांचा पाणीपुरी विक्रीचा स्टॉल आहे.
ते पाणीपुरी विक्री करीत असताना आरोपी त्यांच्या गाडीवर आले.
पाणी पुरी खाल्यानंतर राठोड यांनी पैसे मागितले असता त्यांनी तु मुझे पेहचानता नही क्या, मेरा नाम आप्पा लोंढे है मै यहा का भाई हुँ, बादमे अगर कभी पैसे मांगेगा तो तुझे जान से मार दुंगा असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी यांनी त्यांना प्रतिकार केला असता त्यांनी तेथे पडलेल्या लाकडी बांबुने फिर्यादीच्या डोक्यात,
उजव्या हातावर, तोंडावर, पायावर मारहाण करुन जखमी केले.
पाणीपुरीच्या गाडीच्या गल्ल्यातील दीड हजार रुपये जबरदस्तीने चोरले.
पाणीपुरीच्या गाडीची बांबुनी तोडफोड करुन नुकसान केले.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.

 

Web Title : – Pune Crime | Gangster terror in the name of Appa Londhe The driver was beaten up for asking money for panipuri the stall vandalized

हे देखील वाचा :

PI Appasaheb Shewale | पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

Related Posts