IMPIMP

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

by nagesh
Pune Crime News | life imprisonment for the accused killed person faked murder pune Saswad Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचे पेपर फोडून (Health Department Recruitment Paper Leak Case Pune) त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. या प्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) करुन आरोपींना अटक (Pune Crime) केली आहे. अटक करण्यात आलेल्या उद्धव प्रल्हाद नागरगोजे (Uddhav Pralhad Nagargoje) व राजेंद्र पांडुरंग सानप (Rajendra Pandurang Sanap) यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे (Pune District and Sessions Court Judge V.A. Patravale) यांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे प्रकरण ?

आरोग्य विभाग गट – ड या परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार अनेकांनी फोन करुन पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) दिली होती. सायबर पोलिसांनी याची सखोल चौकशी करुन 20 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध आयपीसी 420, 406, 409, 120 B, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला. आरोपी उद्धव नागरगोजे (वय – 36) व राजेंद्र सानप (वय – 51) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डोलारे यांच्या कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला. (Pune Crime)

न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून आरोपींची प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सचिन झालटे – पाटील (Adv. Sachin Zalte-Patil), अ‍ॅड. तेजेवंती कपले (Adv. Tejevanti Kapale) व अ‍ॅड. पवनराजे डोईफोडे (Adv. Pawan Raje Doiphode) यांनी काम पाहिले.

 

Web Title :-  Pune Crime | Health department grants bail to two accused in paper leak case

हे देखील वाचा :

Shivsena Leader Arjun Khotkar | शिवसेनेला आणखी एक धक्का ! अर्जुन खोतकरांवर ED ची कारवाई

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याविरूध्दच अविश्वास प्रस्ताव, होणार कारवाई ?

Maharashtra Political Crisis | ”बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे…’ – अजित पवार

Related Posts