IMPIMP

Pune Crime | ‘बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर’, पत्नीवर जबरदस्ती; पुढं झालं असं काही

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एका महिलेला पतीनेच वेश्या व्यवसाय (Prostitution Business) करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. हा प्रकार 8 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 या कालावधीत संभाजी चौक, पाषाण (Pashan) याठिकाणी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि.30) देहू रोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) सासू, सासरे, मामी, मामा, जाऊ, दीर, पती यांच्या विरोधात तक्रार दिली आहेत. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला मधुमेह (Diabetes) असल्याची माहिती लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या मामा आणि मामीने लपवून ठेवली. लग्नानंतर पतीच्या मधुमेहाच्या उपचारासाठी (Treatment) माहेराहून पैसे आणण्यासाठी सासू (Mother in Law) – सासऱ्यांनी (Father in Law) महिलेला दमदाटी करुन शिवीगाळ करत मारहाण (Beating) केली. पतीला मधुमेह असल्याची माहिती लपवून का ठेवली अशी विचारणा फिर्यादी महिलेने मामा आणि मामीकडे केले. त्यावेळी मामा, मामी आणि जाऊ यांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. तसेच मामी, दीर आणि एका व्यक्तीने फिर्यादीसमोर कमी कपडे घालून तिच्यासमोर गैरवर्तन करत विनयभंग (Molestation Case) केला. (Pune Crime)

आरोपी पतीने मधुमेहाच्या औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी फिर्यादी यांना पुण्यात वेश्या व्यवसाय चालणाऱ्या बुधवार पेठेत (Budhwar Peth, Pune) नेले. याठिकाणी फिर्यादी यांना वेश्या व्यवसाय कर म्हणून विचारणा केली. फिर्यादी यांनी नकार दिल्याने पतीने घरी आल्यानंतर फिर्यादी यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला. तसेच महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिलेले स्त्रीधन परत न करता फिर्यादी महिलेला घरातून हकलून दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | husband forced wife for prostitution business budhwar peth in pimpri chinchwad

हे देखील वाचा :

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, माणिकचंद ऑक्सिरीच संघांची विजयाची हॅट्रीक

Anxiety Relief Tips | तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास पाणी सुद्धा कमी करते अस्वस्थता आणि चिंता?

Nails Health | ‘या’ 4 कारणामुळे खराब आणि कमजोर होतात नखे, आजारांचा देतात संकेत; जाणून घ्या

Related Posts