IMPIMP

Pune Crime | लक्झरी बसमधून विदेशी दारुची बेकायदा वाहतूक ! राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बससह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Illegal transport of foreign liquor from luxury buses! State Excise Department seizes Rs 80 lakh worth of goods including buses

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | गोव्याहून (Goa) लक्झरी बसमधून बेकायदेशीरपणे विदेशी दारु व बिअरची तस्करी (Smuggling)
करुन पुण्यात आणलेला माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) पकडला आहे. याप्रकरणी लक्झरी बस (Luxury Bus),
तीन चाकी  रिक्षासह 80 लाख रुपयांचा माल जप्त केला असून चौघांना अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंगेश पोपट मोरे (Mangesh Popat More), अक्षय बाळासाहेब हुलगे (Akshay Balasaheb Hulge), पंकज देवनारायण निसाद (Pankaj Devnarayan Nisad) व रवींद्र अशोक घारगे (Ravindra Ashok Gharge) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चौघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. (Pune Crime)

गोव्यातून एका लक्झरी बसमधून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिरासमोर एका लक्झरी बसमधून विदेशी मद्य व बिअरचा साठा उतरवून तो तीनचाकी रिक्षामध्ये भरला जात होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही बस व रिक्षा जप्त केली आहे. ज्या ठिकाणी ही साठा ठेवण्यात येणार होता त्या कात्रज येथील अंजनीनगर येथील रवींद्र घारगे (Ravindra Gharge) यांच्या घरावर छापा टाकला. तेथे 3 लाख 93 हजार 720 रुपयांचा माल आढळून आला. त्यामध्ये विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण 45 बॉक्स तसेच लक्झरी बस व तीन चाकी रिक्षा असा एकूण 80 लाख 8 हजार 60 रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई  निरीक्षक आर पी शेवाळे (Inspector R.P. Shewale), एस एल पाटील, टी बी शिंदे,
दुय्यम निरीक्षक चंद्रकांत रासकर, राजेंद्र झोळ, संजय राणे, प्रशांत दळवी, राम सुपेकर, अमित वालेकर, योगेंद्र लोळे,
संकेत वामन, कर्मचारी राजेश पाटील, शरद भोर, समीर पडवळ, राजू पोटे, महेश बनसोडे, रणजित चव्हाण,
दत्ता पिलावरे, नवनाथ पडवळ, वासुदेव परते, उज्वला भाबड यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Illegal transport of foreign liquor from luxury buses! State Excise Department seizes Rs 80 lakh worth of goods including buses

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | ‘आदित्यला विठ्ठलाभोवतीचा बडवा म्हणता, मग स्वत:चा मुलगा खासदार, हे कसं चालतं?’ – CM उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; म्हणाले – ‘ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा’

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची न्यायालयात धाव

Related Posts