IMPIMP

Pune Crime | तुम्ही ओला इलेक्ट्रिक दुचाकी बुक केली असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी ! डिलिव्हरी देण्याच्या नावाखाली ग्राहकाला 1 लाख 34 हजारांना गंडा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ओला इलेक्ट्रीक कंपनीने (Ola Electric Company) इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Bike) बाजारात आणली आहे़ त्यासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे ऑनलाईन बुकिंग केलेल्या एका ग्राहकाला डिलिव्हरी देण्याच्या नावाखाली फोन करुन त्याला बिहार (Bihar) व उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) 1 लाख 34 हजार रुपयांना गंडा घातल्याचे (Pune Crime) समोर आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथे राहणार्‍या एका 40 वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुलाम इलियास Ghulam Elias (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी गेल्या वर्षी सप्टेबरमध्ये 499 रुपये भरुन ओला इलेक्ट्रिक दुचाकी बुक केली होती. त्यांना 21 जानेवारी रोजी एक कॉल आला. त्याने ओला कंपनीतून बोलतोय, असे सांगून त्याने तुम्ही गाडी बुक केली आहे. तुमच्या गाडीची डिलिव्हरी द्यायची आहे, असे सांगून त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर गाडीचे बिल पाठविले. तसेच उर्वरित बिल भरण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना बंधन बँक मधुबन शाखेतील (Bandhan Bank Madhuban Branch) अकाऊंट नंबर पाठविला.

फिर्यादी यांनी बंधन बँकेच्या खात्यावर एन ई एफ टी द्वारे 1 लाख 19 हजार 500 रुपये पाठविले.
त्यांनी फिर्यादी यांना पैसे भरल्याची पावती व्हॉटसअ‍ॅपवर पाठविली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांना पुन्हा फोन आला.
त्यात त्याने गाडीच्या इन्शुरन्ससाठी व रजिस्ट्रेशनसाठी 14 हजार 700 रुपये भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी हेही पैसे भरले.
त्यानंतर त्यांनी त्या मोबाईलधारकाला फोन केला. पण त्याने उचलला नाही.
काही दिवस वाट पाहिल्यानंतरही त्यांना गाडीची डिलिव्हरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना शंका आली.
त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) तक्रार दिली.
सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्या मोबाईलवरुन त्यांना फोन येत होता, तो गुलाम इलियास (रा. उत्तर प्रदेश) याचा असून बंधन बँकेच्या मधुबन शाखेत ज्या बँक खात्यात पैसे गेले, ते खाते एचआर ट्रेडिंग या नावाने असल्याचे उघडकीस आले. त्याचा ओला कंपनीशी काही संबंध नसल्याचे उघड झाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ओला इलेक्ट्रीक दुचाकीसाठी कोणी कोणी बुकिंग केले आहे, त्याची माहिती मिळवून त्यांना फोन करुन फसवणुकीचा नवा फंडा सुरु केल्याचे दिसून येत आहे.
ओला इलेक्ट्रिक दुचाकीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बुकिंग केले आहे.
कंपनीच्या उत्पादनापेक्षा कितीतरी पट बुकिंग झाले आहे.
सायबर चोरट्यांनी ही बुकिंगची माहिती मिळवून फसवणुक सुरु केल्याचे दिसून येत असून ज्यांनी अशा प्रकारे बुकिंग केले आहे.
त्यांनी अगोदर खात्री करुनच पुढे व्यवहार करावा.

 

Web Title :- Pune Crime | Important news for you if you have booked a electric bike 1 lakh 34 thousand to the customer in the name of delivery

हे देखील वाचा :

PMSYM Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेंतर्गत निवृत्तीनंतर दरवर्षी मिळेल भरघोस पेन्शन; जाणून घ्या योजना

Pregnant Woman Diet | प्रेग्नंट महिलांनी 1 ते 9 व्या महिन्यापर्यंत काय खावे? आयुर्वेदात ‘हे’ आहेत परफेक्ट डाएट

Presidential Election 2022 | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री; खासदार-आमदाराबरोबर संपर्क वाढवला

Related Posts