IMPIMP

Pune Crime | महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रकरणात Coca-Cola कंपनीने घेतलेला ‘तो’ निर्णय औद्योगिक न्यायालयाकडून कायम, याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळला

by nagesh
Pune Crime | Bail granted to highly educated accused in rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याप्रकरणी कोका-कोला कंपनीच्या (Coca-Cola India Pvt. Ltd.) व्यवस्थापनाने सहाय्यक व्यवस्थापकाला (Assistant Manager) कामावरुन कमी केले होते. याप्रकरणी कंपनी विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुणे औद्योगिक न्यायालयाने (Pune Industrial Court) कंपनीच्या बाजूने निर्णय देत (Pune Crime) कंपनीने घेतलेला निर्णय कायम ठेवल्याची माहिती अ‍ॅड. श्रीकांत मालेगांवकर (Adv. Shrikant Malegaonkar) यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी कोका-कोला कंपनीने सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मीकांत अरुण नलगे (Laxmikant Arun Nalage) यांना कामावरुन कमी केले होते. कंपनीच्या निर्णयाविरोधात नलगे यांना पुणे औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. औद्योगिक न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी के.एन. गौतम (Magistrate K.N. Gautam) यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत कोका-कोला कंपनीच्या बाजूने निकाल देत याचिकाकर्त्यांचा अर्ज फेटाळून लावला. (Pune Crime)

काय आहे प्रकरण?

कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मीकांत अरुण नलगे यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय Coca-Cola India Pvt. Ltd. च्या व्यवस्थापनाने (Management) घेतला होता. नलगे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाचा निर्णय बेकायदेशीर (Illegal) असून कामावरुन कमी करण्यापूर्वी व्यवस्थापनाने कायद्याची योग्य ती प्रक्रिया पार पडली नाही. तसेच चौकशी ही एकतर्फी असल्याचे सांगून औद्योगिक न्यायालय क्र.1 येथे कंपनी व्यवस्थापनाच्या निर्णयाला स्थगिती देऊन कामावर पुन्हा रुजू करुन घेण्यासाठी अर्ज केला होता.

अ‍ॅड. श्रीकांत मालेगांवकर यांनी व्यवस्थापनाच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की, 16 मार्च 2022 रोजी दोन महिला कामगारांनी नलगे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. महिलांच्या तक्रारीची दखल घेत कमिटीने चौकशीसाठी समितीचे गठन केले होते. या समितीसमोर दोन्ही पक्षांची बाजू ऐकण्यात आली. तसेच दोन्ही पक्षकारांना वाटाघाटी करण्याचा पर्याय समितीने सुचवला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

परंतु समितीने केलेल्या चौकशीत याचिकाकर्ते नलगे हे दोषी आढळून आल्याने अस्थापनाच्या नियमाप्रमाणे नलगे यांना कामावरुन कमी करण्याची शिफारस करण्यात आली.
समितीच्या शिफारसीनुसार व्यस्थापनाने नलगे यांना कामावरुन कमी केले.
तसेच कायद्याची योग्य ती प्रक्रिया पार पाडून व नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार चौकशी केली असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. मालेगांवकर यांनी केला.
यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तसेच वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या (High Court) निर्णयाचे दाखले दिले.

औद्योगिक न्यायालयाने अ‍ॅड. श्रीकांत मालेगांवकर यांचा युक्तिवाद मान्य करुन याचिकाकर्ते लक्ष्मीकांत नलगे यांना
कामावरुन काढून टाकण्याच्या कंपनीचा निर्णय कायम ठेवला. तसेच नलगे यांचा अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणात अ‍ॅड. श्रीकांत मालेगांवकर, अ‍ॅड. हरुन बानेदार (Adv. Harun Banedar) आणि
अ‍ॅड. कुणाल पगार (Adv. Kunal Pagar) यांनी काम पाहिले.

Web Title :- Pune Crime | Industrial court upholds ‘that’ decision taken by Coca-Cola company in sexual harassment case of women, rejects petitioner’s application

हे देखील वाचा :

Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकार गोरगरीबांची दिवाळी गोड करणार, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

Anil Deshmukh | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मोठा दिलासा, तब्बल 11 महिन्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण…

Related Posts