IMPIMP

Pune Crime | IT इंजिनिअर महिलेला Tinder Dating App वरील ओळख पडली महागात; लग्नाच्याआमिषाने 73 लाखांचा गंडा

by nagesh
Pune Crime | IT engineer woman Tinder Dating App; cheating of Rs 73 lakh for marriage

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | टिंडर डेटिंग अ‍ॅपवर (Tinder dating app) ओळख झालेल्या एका भामट्याने आयटी अभियंता (IT Engineer) असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील (Pune Crime) वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत हा प्रकार घडला असून भामट्याने महिलेची तब्बल 73 लाख 59 हजार 530 रुपयांची फसवणूक (Cheating) केली आहे. हा प्रकार जून 2021 ते जुलै 2021 या कालावधीत घडला असून 35 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही उच्चशिक्षित असून आयटी अभियंता म्हणून एका आयटी कंपनीत नोकरी करते. महिलेने लग्नासाठी
वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर सर्चिंग केले. यामध्ये टिंडर डेटिंग अ‍ॅपवरुन एस. रवी (S. Ravi) नावाच्या प्रोफाइल धारकाशी ओळख झाली. त्यानंतर रवीने महिलेला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिला. त्यानंतर सिद्धार्थ रावी (Siddharth Ravi) नाव सांगितले. तसेच आणि एका व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देऊन जेनी रवी (Jenny Ravi) नाव सांगितले. त्यानंतर महिलेसोबत ओळख वाढून तिचा विश्वास संपादन केला. तसेच लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष (Pune Crime) दाखवले.

याच दरम्यान आरोपीने महिलेला महागडे गिफ्ट दिले. त्यामुळे महिलेचा आरोपीवर विश्वास बसला.

यानंतर महिलेला भेटण्यासाठी भारतात (India) आलो असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळ कस्टम ऑफिसरने (Delhi Airport Customs Officer) पकडले असल्याची माहिती महिलेला दिली. ही रक्कम सोडवण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी (GST) तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी वेगवेगळी कारणे सांगितले. महिलेला बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे (Cyber cell) अर्ज करुन तक्रार दाखल (Pune Crime) केली.
त्यानुसार चौकशी करुन वाकड पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक ए.बी. जगताप (PSI A.B. Jagtap) करीत आहेत.

Web Title: Pune Crime | IT engineer woman Tinder Dating App; cheating of Rs 73 lakh for marriage

हे देखील वाचा :

Pune News | हजारो महिलांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी मातेची महाआरती

Blade India | पुण्यातून मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Related Posts