IMPIMP

Pune Crime | 27 वर्षीय नियोजीत पत्नीला जेवणास नेलं फार्म हाऊसवर आणि केलं ‘हे’ कृत्य; पुण्याच्या कोंढावा परिसरातील धक्कादायक घटना

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भावी पत्नीने दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये, तसेच त्याच्याशी लग्न करु नये, म्हणून तरुणीला जेवायला नेण्याच्या बहाण्याने बंद फार्म हाऊसवर नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) एका तरुणाला अटक (Pune Crime)  केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आरिफ इसाक शेख (वय २९, रा. मेयफेअर एलिगेट, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका २७ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणी आणि आरोपी आरिफ शेख यांचे लग्न जमले आहे. या दरम्यान, शेख याने आपल्या भावी पत्नीकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख रुपये घेतले आहेत. १६  ऑगस्ट रोजी रात्री  फिर्यादी यांना शेख याने जेवण्याच्या बहाण्याने  सासवड रोडच्या (Saswad Road) कडेला असलेल्या एका बंद फार्म हाऊसवर नेले. तेथे फिर्यादी यांनी दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये तसेच त्याच्याशी लग्न करु नये असे त्याने सांगितले. त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर त्याने जड वस्तूने या तरुणीच्या डोक्यामध्ये वार केला. तसेच चॉपरसारख्या हत्याराने गळ्यावर, मानेवर, हातावर, दंडावर, मांडीवर वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी उपचार घेतल्यानंतर आता तक्रार केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आरिफ शेख याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | kondhwa police arrest youth. Who attempt to murder of 27 years old girl

हे देखील वाचा :

Maharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ ! कम्युनिटी पोलिसिंगवर भर, माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालणार्‍या गडचिरोलीला ‘दुहेरी’ यश, औरंगाबाद, रायगडही ‘अव्वल’स्थानी

Pune Corporation | सर्वच वाहनतळ एकाच ठेकेदाराला देण्याच्या निविदेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ‘प्रतिसाद’ नाही; ‘झोन’निहाय ‘ग्रुप’ करून स्वतंत्र निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या हालचाली

Pune Crime | मराठे ज्वलर्स फसवणूक प्रकरण : मंजिरी मराठेसह कौस्तुभ मराठेंना अटक

Nashik Crime | लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद, मग सुरु केला थेट नकली नोटांचा छापखाना; नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश

OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करावा ! ओबीसी समाजाचा विश्वासघात करणार्‍या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन

Related Posts