IMPIMP

Pune Crime | दारु अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना दिल्या शिव्या; मालकाने केला कामगाराचा खून, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Pimpri Crime | seven minor boys murdered friend in pimpri chinchwad of pune

पुणे / पिंपरी: सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | दारु अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना शिव्या (Swearing at customers) दिल्याच्या रागातून अड्डा मालकाने कामगाराचा खून (Worker murder) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. आरोपीने कामागराला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन डोक्यात दगड मारुन खून केला. ही घटना चिखली येथील भिमशक्तीनगर (Bhimshaktinagar Chikhali) येथे शुक्रवारी (दि.19) सकाळी 9 ते 11.30 या दरम्यान घडली. याप्रकरणी दारु अड्डामालकावर चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

मनोहर गलाप्पा डोंगरे Manohar Galappa Dongre (वय-55 रा. भिमशक्तीनगर, चिखली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
आशिष गवळी Ashish Gawli (रा. भिमशक्तीनगर, झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुनिल मनोहर डोंगरे (वय-24 रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष गवळी याचा भिमशक्तीनगर येथे दारु विक्रीचा (selling liquor) धंदा आहे.
डोंगरे हे तेथे दारु विक्रीचे काम करतात. डोंगरे यांनी दारु पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शिवीगाळ केली होती.
याचा राग मनात धरुन आरोपी गवळी याने डोंगरे यांना शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात पाठीमागील बाजुला दगड मारुन खून केला.
असे फिर्यादीत (Pune Crime) नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सय्यद (API Sayyed) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | liquor shop owner kills worker swearing customers in pimpri chinchwad area of chikhali police station marathi news policenama

हे देखील वाचा :

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे ‘साऊंड’ चोरीला ! नगरसेवक सुभाष जगतापांचा डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट

Digital Media | आयटी पॅनलची Fake News वर कायदा करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात होऊ शकते चर्चा

Amazon | धक्कादायक गौप्यस्फोट ! पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रसायनांची Amazon वरुन खरेदी, CAIT चा गंभीर आरोप

Related Posts