IMPIMP

Pune Crime | लाेणी काळभाेर परिसरात दहशत पसरविणारी टोळी तडीपार

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी  परिमंडळ-5 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी तडीपार (Pune Crime) केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रणव भारत शिरसाठ (वय 20, रा. लोणी स्टेशन) अभिजित अभिमन्यू आहेरकर (वय 20, रा. लोणी काळभोर) आणि सौरभ गोविंद इंगळे (वय 21, रा. इराणी वस्ती लोणी स्टेशन लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत.

सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठ हा आपल्या साथीदारांसह लोणी काळभोर गाव (Loni Kalbhor) व परिसरात कोयता व इतर घातक शस्त्रेजवळ बाळगून नागरिक व्यापारी व इतरांना धाक दाखवून प्रसंगी मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करीत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यांनी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसर, लोणी स्टेशन परिसरात जबरदस्ती दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी या तिघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन प्रणव शिरसाट टोळीला पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस
अंमलदार संदीप धनवटे, गणेश भापकर, मल्हार ढमढेरे यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य केले.

Web Title : Pune Crime | Loni kalbhor police action on criminals

हे देखील वाचा :

Weight Loss Tips | वेगाने वजन कमी करण्यासाठी रोज इतके मिनिटे करा ‘ही’ एक्सरसाईज, जाणून घ्या

KGF Chapter 2 Release Date | ’केजीएफ 2’ची प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी रिलिज होईल चित्रपट; जाणून घ्या नवीन तारीख

Health Care Tips | चहा पिताना कधीही करू नका 4 चूका, अन्यथा ‘या’ आजारांना पडू शकता बळी; जाणून घ्या

Payment Aggregators | डेबिट, क्रेटिड कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

Related Posts