IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या मिल्स परिसरातील Hotel 2BHK च्या पार्किंगमध्ये तरुणीचा मध्यरात्री विनयभंग

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील मिल्स परिसरातील (The Mills, Pune) टु बीएचके हॉटेलमध्ये (Hotel 2BHK Pune) जेवण करुन पार्किंगमध्ये मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणीला जवळ ओढून तिचा विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार ताडीवाला रोडवरील मिल्स परिसरातील टु बीएचके हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडला. त्याला या तरुणीच्या मित्राने विरोध केल्यावर त्याला हाताने मारहाण करण्यात आली. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) ओहानसिंग सहानी Ohansingh Sahani (वय २०, रा. औंध – Aundh) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अगोदर सहानी याने दिलेल्या तक्रारीवरुन बंडगार्डन पोलिसांनी बॅडमिंटनचा प्रशिक्षक शुभम शिंदे (Badminton Coach Shubham Shinde) व त्याच्या ८ ते १० साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणात कोथरूडमध्ये (Kothrud) राहणार्‍या एका १९ वर्षाच्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे.
ही घटना १३ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता टु बीएचके हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली होती.

फिर्यादी या त्यांच्या मित्रांसोबत जेवण करुन हॉटेलच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत थांबल्या होत्या.
शेजारील बाजूला ८ ते १० जण आपआपसात भांडणे करीत असताना त्यातील ओहानसिंग सहानी याने फिर्यादीजवळ येऊन तिचा डावा हात धरुन आपल्याजवळ ओढले.
त्याच्या पँटची चेन उघडून विनयभंग केला. तिच्या मित्राने विरोध केल्यावर सहानी याने त्याला हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली, म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याअगोदर ओहानसिंग सहानी याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दिली होती.
सहानी एका इव्हेंट कंपनीत काम करतो. पुणे स्टेशनच्या (Pune Railway Station) पाठीमागील बाजूस असलेल्या राजा बहादूर द मील (Raja Bahadur Mill Pune) जवळील टु बीएचके हॉटेलमध्ये त्याच्या इव्हेंट कंपनीला १३ मार्च रोजी काम मिळाले होते.
ते संपल्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो व त्याची मैत्रीण पार्किंगमध्ये थांबले होते.
त्यावेळी तेथे असलेल्या टोळक्यातील एकाने साहनीच्या मैत्रिणीकडे पाहून शिट्टी वाजविली.
तसेच तिला अश्लील भाषेत आवाज दिला. त्यांच्यातील एकाने साहनीला शिवीगाळ केली.
त्यानंतर टोळक्याने साहनी यास पार्किंगमधील बॅरीगेटसवर पाडून लोखंडी सळई व साखळ्यांनी जबर मारहाण केली.
त्याच्याकडील चैन व ६ हजार ५०० रुपये असलेले पॉकेट जबरी चोरी करुन चोरुन नेले.

Web Title :- Pune Crime | Midnight molestation of a young woman in the parking lot of Hotel 2BHK Raja Bahadur Mill The Mills Pune

हे देखील वाचा :

Breasts Sagging ची समस्या दूर करण्यासाठी 5 सोप्या आणि प्रभावी पद्धती

Malaika Arora Glamorous Look | मलाइका अरोरानं ग्लॅमरस फोटो शेअर करून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग

Aaditya Thackeray | शिवसेना-भाजप युती ? आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले-‘पुढील काळात भाजपसोबत…’

Related Posts