IMPIMP

Pune Crime | MPSC च्या गट क सेवा मुख्य परीक्षेत पुण्यात गैरप्रकार, ब्ल्यूटूथ इयरफोन जप्त; उमेदवारावर FIR

by nagesh
Pune Crime | mpsc mobile blue tooth earphones are collected by the candidate during combined paper 1 examination pune print news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा-2021 (Maharashtra Group C Services Main Exam-2021) संयुक्त पेपर एकच्या परीक्षेवेळी एक उमदेवार गैरप्रकार करताना आढळून आला. या प्रकराची गंभीर दखल घेऊन एमपीएससीकडून उमेदवारावर कायदेशीर कारवाई (Legal Action) सुरु केली आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) नऱ्हे येथील उपकेंद्रावर (Sub-Centre Narhe) उघडकीस आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

MPSC कडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 परीक्षा राज्यभरातील सहा जिल्हा केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. यावेळी नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंह चैनसिंग गुसिंगे (Kewal Singh Chainsingh Gusinge) या उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. उमेदवाराकडे लपवलेले मोबाईल फोन (Mobile Phone) आणि ब्ल्यूटूथ इयरफोन (Bluetooth Earphone) इत्यादी साहित्य सापडले. या प्रकाराची एमपीएससीकडून गंभीर दखल घेत नियमानुसार कारवाईची प्रक्रिया करुन गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे (MPSC Joint Secretary Sunil Avatade) यांनी सांगितले,
या परीक्षेमध्ये अत्याधुनिक उपकरणाच्या आधारे गैरप्रकाराचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाला मिळाली होती.
त्यानुसार आयोगाच्या दक्षता पथकाने अचाकन संबंधित संशयित उमेदवारांची तपासणी केली.
त्यामध्ये एका उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे समोर आले असून गुन्हापात्र साहित्य जप्त करण्यात आले.
त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | mpsc mobile blue tooth earphones are collected by the candidate during combined paper 1 examination pune print news

हे देखील वाचा :

Kolhapur ACB Trap | पुण्यातील शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागणारा पोलीस गोत्यात, एसीबीकडून FIR; पोलीस दलात प्रचंड खळबळ

Pune Crime | पोलीस मित्र असल्याचे सांगून बलात्काराच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी, तरुणाला लुबाडणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

Pune Crime | दरमहा 20 टक्के व्याज घेऊनही धमकाविणार्‍या सावकराला अटक

Related Posts