IMPIMP

Pune Crime | कोंढाव्यात वीज खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण

by nagesh
Pune Crime | MSEDCL employees beaten due to power outage in Kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोंढव्यातील वीज पुरवठा रात्रीपासून खंडीत झाल्याने संतापलेल्या दोघांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचार्‍याला मारहाण केली. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दत्तात्रय काळुराम धांडेकर (वय ३५) आणि प्रथमेश सोपान धांडेकर (वय २९, दोघेही रा. धांडेकरनगर, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सुनिल शंकर पाटील (वय ५६, रा. आंबेगाव) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवा (Kondhwa) येथील महावितरणच्या (Mahavitaran) सोमजी शाखा येथे बुधवारी सकाळी १० वाजता घडला.

धांडेकरनगर येथील वीजपुरवठा आदल्या रात्रीपासून खंडीत झाला होता. त्यामुळे चिडलेले धांडेकर हे सोमजी शाखा येथील कार्यालयात आले. त्यांनी रात्रीपासून लाईट बंद  आहे, कधी सुरु होणार अशी चौकशी केली. त्या कारणावरुन शिवीगाळ करुन तेथील कर्मचारी कृष्णा गुट्टे यांना गालावर तसेच डोक्यावर हाताने चापटी मारल्या. फिर्यादी हे सोडविण्यासाठी मध्ये पडले असताना त्यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. कार्यालयामध्ये दोघांनी मिळून आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन तुम्हाला आता सर्वांना दाखवितो, असे बोलून धमकी दिली.दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल करुन पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | MSEDCL employees beaten due to power outage in Kondhwa

हे देखील वाचा :

ST Workers Strike | आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

Maharashtra Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी

Parambir Singh | फरार मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच, ‘या’ ठिकाणी आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त

Related Posts