IMPIMP

Pune Crime | सिंहगड रोडवरील नर्‍हे परिसरात टोळक्याकडून एकाचा खून

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) नर्‍हे येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यात एकाचा मृत्यु झाला (Murder In Pune). आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा संशय आहे. सुनिल राधाकिसन नलवडे (वय ५४, रा. भैरोबा नाला, फातिमानगर) असे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे (वय ५७) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२८/२२) दिली आहे. ही घटना नर्‍हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेंन्सी जवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल नलवडे हे पूर्वी कॅम्प भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत असत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेंन्सी जवळ एका चार चाकी गाडीमधून पाच ते सहा जण सुनिल नलवडे यांना घेऊन आले (Pune Crime). त्यांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर सुमारे २ तासांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली़ तोपर्यंत ते तेथेच जखमी अवस्थेत पडून होते. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले़ मात्र पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांचा  मृत्यु झाला.

गेल्या काही वर्षांपूर्वी सुनिल नलवडे यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यु झाल्याने ते एकटेच रहात होते.
झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम ते करत असत. त्यांनी काही जणांकडून कर्ज घेतल्याची माहिती मिळत आहे.
फिर्यादीचा भाऊ असले तरी गेल्या ५ वर्षांपासून त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता.
सिंहगड रोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Murder In Narhe Sinhagad Road Police Station Limits

हे देखील वाचा :

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | देवा रे देवा….! पावणेदोन कोटींची मर्सिडीज बेन्झला रिक्षा पडली भारी; कंपनीच्या सीईओना ट्राफिकचा फटका

Related Posts