IMPIMP

Pune Crime | पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून; आंबेगाव बुुद्रुकमध्ये मध्यरात्री घडलेला प्रकार

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणावर सपासप वार करुन त्याचा खून (Murder) केला. हा प्रकार कात्रज सिंहगड रोड (Sinhagad Road) दरम्यानच्या नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर रात्री साडेअकरा वाजता (Pune Crime) घडला.

शरद शिवाजी आवारे (वय ४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम (वय ३७, रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यावरुन पोलिसांनी प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदारावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे व्याज शरद दर महिन्याला देत होता. मात्र, या महिन्यात त्याने व्याज दिले नाही. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला कात्रज रोडवरील चंद्रसखा वेअरहाऊसजवळ बोलावले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

तेव्हा चिडलेल्या प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद याच्यावर सपासप वार केले व ते पळून गेले.
जखमी अवस्थेत शरद याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

हे देखील वाचा :

Unified DCPR Maharashtra | खुशखबर ! 1 जानेवारी 2022 पासून राज्यभरात बांधकामांना ऑनलाईन परवानगी

Corona-Omicron Variant | घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’ होणार

Multibagger Stock | पुढील दोन-तीन महिन्यात चांगला रिटर्न देऊ शकतो SCI चा स्टॉक; व्हाल मालामाल

Related Posts