IMPIMP

Pune Crime | ‘तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली तुझा गेमच करतो’ ! मारहाण होत असताना मदत न केल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | Murderous attack on a youth by a gang out of prejudice Incident at Sutardara in Kothrud Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आरोपीला मारहाण होत असताना मदत न करता निघून गेल्याच्या रागातून दोघांनी तरुणाच्या घरात शिरुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घराबाहेर लावलेल्या दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या पेटवून दिल्या. येरवड्यातील कंजारभाट वस्तीत मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता हा प्रकार घडला. येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शुभम गजरात खरारे (वय २२, रा. कामराजनगर, येरवडा) आणि सुखीराम किसन वाल्मिकी (वय २७, रा. कंजारभाट वस्ती, येरवडा) अशी अटक
केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल केरबा मोरे (वय २५, रा. कंजारभाट वस्ती, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणांमध्ये शुभम खरारे याला मारहाण होत होती. त्यावेळी कुणाल मोरे याने कोणतीही मदत न करता तो निघून गेला होता. त्याच शुभम याला राग होता. त्यातून कुणाल हा पहाटे घरात झोपलेला असताना दोघेही आरोपी आले. त्यांनी दरवाजावर लाथा मारुन शिवीगाळ करीत कुणालला बाहेर बोलावले. आज तुला खल्लास करतो. तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली. आज तुझा गेमच करतो, असे म्हणून त्याने पालघन फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्याने तो हुकविला व ते घरामध्ये पळून जाऊन दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे दोघा आरोपींनी घराबाहेर लावलेल्या फिर्यादी व त्यांचे दाजी नंदलाल राजबर यांची २ मोटारसायकलवर पेट्रोल टाकून आग लावून नुकसान केले व परिसरात दहशत निर्माण केली. येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे़.

Web Title : Pune Crime | ‘My life is ruined because of you, I play your game’! Attempted murder of a young man for not helping while being beate

हे देखील वाचा :

Save Money | कमी कमाईत सुद्धा कशी करावी पैशांची मोठी बचत, जाणून घ्या 10 चांगल्या आणि सोप्या पद्धती

Aruna Bhatia Death | अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन, अभिनेता म्हणाला – ’आज मी असह्य वेदनांमध्ये आहे…’

Pune Police Suspended | पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात केली परस्पर ‘खाडाखोड’; पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Related Posts