Pune Crime News | धनकवडीत कोयते उगारुन टोळक्याची दहशत ! तरुणावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न, गोविंद पाटीलनगर मधील घटना

पुणे : Pune Crime News | धनकवडी भागात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बाबा मालुसरे (वय १९), संकेत कसबे (वय १८), सोहम सोनार (वय २०, सर्व रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत नितेश विनोद गायकवाड (वय १८, रा. गोविंद पाटीलनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरासमोर थांबला होता. त्यावेळी आरोपी मालुसरे, कसबे, सोनार हे दुचाकीवरुन आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठ मोठ्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोहम सोनार याने त्यांच्याकडील कोयता काढून नितेश याच्यावर वार केला. त्याने हातावर वार झेलण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला. नितेश गायकवाड याच्या घरासमोर त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत त्यांच्याकडील कोयते हवेत फिरवून आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचे नाही, असे मोठमोठ्याने म्हणत दहशत माजविली. पोलीस हवालदार धोत्रे तपास करीत आहेत.
Comments are closed.