Pune Crime News | भर चौकात वादातून पिस्तुल रोखणाऱ्या सराईत गुन्हेगाराला क्रॉप्स 24 च्या मार्शलने केले गजाआड

Pune Crime News | A criminal who was caught with a pistol in a dispute at Bhar Chowk was arrested by the marshal of Crops 24.

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी, इटालियन बनावटीचे पिस्तुल जप्त

पुणे : Pune Crime News | भर चौकात वादावादी झाली असताना एका सराईत गुन्हेगाराने पिस्तुल काढल्याची माहिती डायल ११२ वर मिळताच गस्त घालणारे क्रॉप्स २४ चे मार्शल आणि विश्रांतवाडी पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला पकडले.

तौफिक ऊर्फ रकीब रफीक शेख Taufik alias Raqib Rafiq Shaikh (वय ३२, रा. श्रमिक वसाहत, सावंत पेट्रोल पंपासमोर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शेख याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात ४ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू असून, एकाने त्याच्याकडील पिस्तूल काढून रोखल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांचे पथक आणि ‘कॉप्स २४’ योजनेअंतर्गत गस्त घालणारे पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेण्यात आले. शेख याच्याकडील पिस्तूल इटालियन बनावटीचे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ५५ हजार रुपयांचे इटालियन पिस्तुल व काडतुस जप्त केले आहे. शेख याच्याकडे शस्त्र परवाना नाही. त्याने हे परदेशी बनावटीचे पिस्तुल चोरले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव तसेच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी लंघे आणि माळी यांनी केली.