IMPIMP

Pune Crime News | भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime News | 25 lakh extortion demand from BJP leader Ganesh Bidkar, know the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | काही दिवसांपुर्वीच पुण्याचे माजी महापौर (Pune Former Mayor) व प्रदेश भाजपचे सरचिटणीस (BJP Leader) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या नावाने स्पुफिंग कॉल (Spoofing Call) करून पुण्यातील एका बिल्डरकडे (Builder In Pune) 3 कोटी रूपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली. त्यामध्ये आरोपींनी केवळ मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे समोर आले होते. त्याला काही दिवस झाले असतानाच आता भाजपचे नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर (Ganesh Bidkar ) यांना Whatsapp Call करून तब्बल 25 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात (Pune Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकर यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी (Extortion Case) झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यासंदर्भात गणेश बिडकर BJP Leader Ganesh Bidkar (50, माजी नगरसेवक, रा. 316, सोमवार पेठ – Somwar Peth) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, दि. 30 मार्च 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजता गणेश बिडकर हे श्रीराम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना एका नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला (Pune Cyber Crime). त्याने हिंदी व मराठी मिश्र भाषेतुन बिडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तो म्हणाला, तुला राजकिय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करून तेरा पुलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तु चुपचाप 25 लाख रूपये दे (Ransom Case), तुने अगर पैसे नही दिये तो तु देख कैसे खेल शुरू होनेवाला है. असे बोलुन त्याने बिडकर यांना शिवीगाळ केली. (Pune Crime News)

बिडकर हे राजकीय जीवनात कम करत आहेत. त्यांची सामाजिक बदनामी करण्याचा हेतू असल्याचे यावरून स्पष्ट होते. गणेश बिडकर यांनी तात्काळ पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. सायबर पोलिसांनी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप नंबर धारकाविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील सायबर पोलिस करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | 25 lakh extortion demand from BJP leader Ganesh Bidkar, know the case

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, बावनकुळे म्हणाले -‘आमची त्यांना विनंती आहे की…’

Ajit Pawar | रोहित माझ्या मुलासारखा, मी असं का करु?, अजित पवारांची स्पष्टोक्ती

Ready Reckoner Rate | 2023-24 मध्ये रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही? जाणून घ्या सविस्तर

Related Posts