IMPIMP

Pune Crime News | मृत माणसाच्या हाडांची पावडर करुन दिली विवाहितेला खायला; धायरीतील धक्कादायक प्रकार उघड, जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | The dead man's bones were powdered and fed to the married woman; Shocking case revealed in Dhairi, case registered under witchcraft act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | व्यावसायिक प्रगती कमी व मुलबाळ होत नसल्यामुळे मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडक्याची अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करुन विवाहितेला जबरदस्तीने खायला लावली. तसेच स्मशानभूमीतून हाडे, राख आणून त्याची पूजा करुन ती राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

धायरी येथील विवाहितेच्या सासरी तसेच निगडी येथे हा प्रकार २७ एप्रिल २०१९ पासून सुरु होता. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) तिच्या सासरच्याकडील लोकांवर विवाहितेचा छळ तसेच नरबळी व अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा अधिनियमाखाली (Witchcraft Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत २८ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बी ई कॉम्प्युटर शिक्षण झाले आहे. त्यांचा २७ एप्रिल २०१९ रोजी विवाह झाला. साखरपु्ड्याला आलेल्या सासरकडील ४५ महिलांना चांदीची जोडवी देण्यास भाग पाडले. लग्नात ८० तोळे दागिने, साडेपाच लाखांची सेलेरीओ कार देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी ती दिली. त्यानंतर प्रत्येक सणाला त्यांची मागणी होत होती. सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठ्या असे २५ ते ३० तोळे सोने पतीला तसेच ५० ते ५५ तोळे सोने फियादीला तिच्या वडिलांनी दिले. जून २०२० मध्ये गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये दिले. (Pune Crime News)

विवाहितेच्या सासरवाडीकडील लोक प्रत्येक अमावेस्येला एकत्र जमून काळे कपडे घालून तळघरातील रहस्यमय खोलीमध्ये काही तरी करत असत. कोरोना महामारीच्या काळात तिच्या सासरची आर्थिक परिस्थिती ढासळायला लागली. त्यामुळे २२ मे रोजी अमावस्येच्या दिवशी त्यांनी अघोरी पूजा मांडली. टाचणी लावलेली लिंबू, काळ्या बाहुल्या, मिरची, हळदी कुंकु, बुक्का असे होते. फिर्यादीच्या जावेने कोणत्यातरी महिलेला व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल लावून ती सांगेल, त्याप्रमाणे पूजा केली. व्यावसायिक भरभराटीसाठी व फिर्यादींना मुलबाळ होत नाही, यासाठी प्रत्येक अमावस्येला अघोरी कृत्य केले जाते होते. एका अमावस्येच्या दिवशी रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्व जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले आणि तेथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली. व राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यानंतर मडक्यातील राख पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले.
या प्रकारानंतर ११ फेबुवारी २०२१ रोजी जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली.
त्यासाठी मृत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय व कोंबड्याचे मुंडके हे सर्व जावेच्या आईवडिलांनी अगोदर आणले
होते. मांत्रिक महिलेने अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करुन ती फिर्यादींना खायला सांगितली.
त्याला तिने नकार दिल्यावर जावेच्या वडिलांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर काढून ते तिच्या डोक्याला लावून जबरदस्तीने पावडर खाण्यास भाग पाडले. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा प्रकार आणखी तीन चार वेळा झाला. त्यामुळे तिला मळमळ व उलट्या होऊ लागल्या.
अंगावर रिअ‍ॅक्शन आली. तरीही तिच्या सासरकडील तिला दर अमावस्येला पूजा करायला लावत.
तु वांझोटी आहे, तुझ्यामुळे आमची आर्थिक प्रगती कमी झाली. तू पांढर्‍या पायाची आहे, असे बोलून छळ करीत आहेत.

त्यानंतर फेबु्वारी २०२१ मध्ये तिला सासरकडील लोकांनी जावेबरोबर तिच्या आईवडिलांच्या कोकणातील एका पुजेसाठी पाठविले होते.
तेथे मध्यरात्री एका धबधब्याखाली आंघोळ करायला लावली. त्यावेळी तिच्या जावेने मांत्रिक महिलेशी व्हॉटसअ‍ॅप कॉलवर मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जावेच्या आईवडिलांनी तिला अघोरी कृत्य करायला लावले.
हा प्रकार तिने पतीला सांगितला. तेव्हा त्याने आम्ही गुंड लोक आहोत, हे कोणाला सांगितले तर तुझ्या
कुटुंबाचा मुडदा पाडू अशी धमकी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादीच्या पतीला क्रेटा गाडी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी ८ लाख रुपये दिले.
तरीही ते अर्धा हिस्सा देण्याची मागणी करीत होते. हा अघोरी प्रकार सुरु होता.
मुलबाळ होत नाही व आई वडिलांनी पैसे देणे बंद केल्यामुळे फिर्यादी यांना २६ मे २०२२ रोजी घरातून हाकलून दिले.
त्यानंतर माहेरी आल्यावर त्यांनी नांदण्यास जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला.
पंरतु त्यांनी दाद न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन फिर्याद दिली असल्याचे त्यात म्हटले आहे.

Web Title :- Pune Crime News | The dead man’s bones were powdered and fed to the married woman; Shocking case revealed in Dhairi, case registered under witchcraft act

हे देखील वाचा :

Nandurbar Police News | दंडपाणेश्वर मंदिर संस्थेकडून एसपी पी.आर.पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

Nirmal Mukherjee Passed Away | प्रसिद्ध वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन

Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलला २८ लाखांना गंडा घालणार्‍या मॅनेजरला अटक

Related Posts