IMPIMP

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटीची खंडणी मागणार्‍या दोघांना अटक; कोल्हापूरच्या गडहिंग्जलमधील एकाचा समावेश (Video)

by nagesh
Pune Crime News | Two arrested for demanding extortion of Rs 3 crore from builder in name of former Pune Mayor Muralidhar Mohol; Including one in Kolhapur's Gadhinglaj (Video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर (Pune Foremer Mayor) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश
सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पुफिंग कॉल – सायबर क्राईम) Spoofing Call – Cyber
Cybercrime वापर करून त्यांच्या नावाने बिल्डरकडे (Builder In Pune) तब्बल 3 कोटी रूपयांची खंडणी (Extortion Case) मागणार्‍या दोघांना
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकजण कोल्हापूर जिल्हयातील (Kolhapur District) आहे. (Pune Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शेखर गजानन ताकावणे Shekhar Gajanan Takawane (35, रा. भालेकर चाळ, कर्वे रोड, पुणे – Karve Raod Pune) आणि संदीप पीरगोंडा पाटील Sandeep Pirgonda Patil (33, रा. मु.पो. बेकनार, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबबात अधिक माहिती अशी की, कोथरूड पोलिस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीतील एका बिल्डरकडे आरोपींनी मुरलीधर मोहोळ (BJP Maharashtra General Secretary Muralidhar Mohol) यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पुफिंग कॉल – सायबर क्राईम) Pune Cyber Crime वापर करून कॉल केला आणि त्यांच्याडके 3 कोटी रूपयांच्या खंडणीची (Ransom Demant) मागणी केली. संबंधित बिल्डर हे मुरलीधर मोहोळ यांचे मित्र असल्याने त्यांनी मोहोळ यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मोहोळ यांनी याबाबतची माहिती तात्काळ सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) यांना दिली. त्यानंतर मोहोळ व त्यांच्या बिल्डर मित्राने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार दिली. (Pune Crime News)

आरोपींना तक्रारदार यांनी फोनवरून 10 लाख रूपये देण्याचे मान्य केले आणि ते घेण्यासाठी कार्यालयात बोलावले.
खंडणी मागणार्‍याने स्वतः न येता त्याच्या ओळखीच्या शेखर गजानन ताकावणे यास बिल्डरच्या
कार्यालयात पाठविले. 10 लाख रूपये घेण्यासाठी आल्यानंतर ताकावणेला गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. खंडणी मागणारा संदीप पाटील हा त्यास स्वारगेट चौकात बोलवत होता. मात्र, तो त्याची ठिकाण बदलत होता. ताकावणेला त्याने कात्रज च्या जुन्या बोगद्याजवळ (Katraj Old Tunnel) बोलवले. त्यानंतर पोलिसांना मुख्य आरोपी संदीप पाटीलचे ठिकाण समजल्यानंतर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना कोथरूड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह आयुक्त संदीप कर्णिक,
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-3 चे
वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), उपनिरीक्षक अजितकुमार पाटील
(PSI Ajitkumar Patil), सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर, पोलिस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळंबे,
प्रताप पडवाळ, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते, विकास चौगुले, सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Pune Crime News | Two arrested for demanding extortion of Rs 3 crore from builder in name of former Pune Mayor Muralidhar Mohol; Including one in Kolhapur’s Gadhinglaj (Video)

हे देखील वाचा :

Nashik News | डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’

Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू; 9 जण थोडक्यात बचावले

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’

RSF Fitness Club | आर.एस.एफ फिटनेस क्लब आता पुण्यात ! सुप्रसिद्ध अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts