IMPIMP

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

by omkar
Vehicle Thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  शहरात वाहनचोरी (vehicle thieves) आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणत अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Chandrakant Patil | एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’

File photo

प्रशांत मधुकर भोसले, हसन इक्बाल शेख व अभिषेक विलास पाडुळे (रा. हडपसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी शहरात गुन्हे शाखेकडून पाहिजे आरोपी सराईत गुन्हेगार माहिती काढली जात आहे.
तसेच हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत आहे.

दरोडा व वाहन चोरी (vehicle thieves) विरोधी पथक हडपसर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली.
कि जुगाडाच्या दोन गाड्या विक्री करायच्या आहेत, कोणी घेणार मिळाला तर सांगा.
त्यानुसार पथकाने काळेपडल भागात सापळा रचून पकडले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले.
त्यांची नावे विचारल्यानंतर त्यांनी नावे सांगितली.
सखोल तपासात त्यांनी मोबाईल व वाहने साथीदार आकाश याच्यासोबत चोरल्याचे काबुल केले.
त्यांच्याकडून वाहन चोरीचे 5 आणि मोबाईल चोरीचे 2 असे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार बुवा कांबळे, उदय काळभोर, दिनकर लोखंडे, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, अमोल सरतापे, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली आहे.

Also Read:- 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

Web Title :  pune crime news Pune Crime Branch arrests vehicle thieves and mobile thieves, reveals 7 cases

Related Posts