IMPIMP

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

by nagesh
MLA Devendra Bhuyar | amravati morshi mla devendra bhuyar sentenced 3 months jail for abusing tehsildar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) : Pune Crime | व्यावसायिकाकडून 3 कोटी रुपयांची जमीन नावावर घेतत्यांनतर 58 गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे आणि हाताने मारहाण (Pune Crime) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी नितीन हमने याचा जामीन अर्ज  न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गुन्हा दाखल झाल्यांनतर आरोपी नितीन हमने (Nitin Humne) याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला
होता. मात्र, त्यावेळी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला होता. आरोपी हमने याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींनी या गुन्ह्यात बंदुकीचा वापर केला आहे, या सर्वांचा तपास सुरू आहे, यावेळी जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद त्यावेळी ॲड. बेंडभर यांनी केला होता. मात्र, आता न्यायालयाने नितीन हमने याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. आजच्या सुनावणी दरम्यान ॲड सचिन झालटे, ॲड अभिषेक जगताप ॲड माधवी पवार यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने हमनेचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. 20 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी ॲड. दिप्ती काळे हिचा ससून रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला या प्रकरणी
नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी 2 आरोपींविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला. त्यावेळी मंगळवार पेठेमधील 33 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली होती. ॲड. दिप्ती
काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. त्यानंतर काळे हिने फिर्यादीच्या पतीस
बांधकाम व्यवसायासाठी 35 लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता.खेड) येथील 3 कोटी रुपयांची 42 गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली 58 गुंठे जमीन नावावर करून दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून, त्याला जेलमध्ये आयुष्यभर सडवेल, अशी धमकी दिली. यानंतर नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून 58 गुंठे जमीन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या नव-‍याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादेत नमूद केलं होतं.

Web Title : pune crime nitin hamne granted bail for threatening to file rape case for grabbing 58 guntas of land

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याचा दर वाढून 46,753 रुपयांवर पोहचला, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंट बोर्डाचा माजी नगरसेवक विवेक यादवनं सीम कार्ड दिली वाशीच्या खाडीत फेकून, पोलीस कोठडीत वाढ

Related Posts