IMPIMP

Pune Crime | ‘ओला-उबेर’ चालकाला पिस्तुल लावून कॅब नेली चोरुन; फिर्याद दाखल होईपर्यंत चोरटे पोहचले मुंबईत

by nagesh
Solapur Crime | son killed mother in barshi of solapur district

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Pune Crime | प्रवासी म्हणून बसलेल्या चौघांनी जबरदस्तीने कॅब पुणे -मुंबई एक्सप्रेसवेला (mumbai pune expressway) घेण्यास सांगून वाटेत अंधारात चालकाला पिस्तुल लावून कॅब जबरदस्तीने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅबचालक पोलिसांपर्यंत पोहचेपर्यंत काही वेळ गेला. प्रत्यक्ष लुबाडल्यानंतर फिर्याद (Pune Crime) नोंद होण्यास तब्बल ४ तास मध्ये गेले. ही हद्द पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयाची की ग्रामीण पोलिसांची हे ठरविण्यात वेळ गेला. तोपर्यंत चोरलेली ही कॅब खालापूर टोलनाका (Khalapur Toll) ओलांडून पुढे मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघून गेली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी प्रदीप परमेश्वर भोंगे (वय २२, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २७ जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजता महाळुंगे के एस बी चौक ते मावळ तालुक्यातील बोरगाव येथे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर घडला.

प्रदीप भोंगे हे ओला उबेर कॅब चालक आहेत. त्यांना ओला उबेर कंपनीकडून कॉल मिळाल्याने रात्री ते
महाळुंगे येथील के एस बी चौकात आले. त्यांनी तेथून त्यांनी चार प्रवाशांना घेतले. कॅबमध्ये
बसल्यावर त्यांनी चालकाला दमदाटी करुन पनवेल येथे जायचे आहे, चल असे म्हणून पुणे -मुंबई एक्सप्रेसवेवर कॅब घेण्यास सांगितले. त्यानंतर हायवेवर त्यांना एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगून त्यांच्यातील एकाने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यानंतर ते चौघे त्यांची कॅब घेऊन मुंबईच्या दिशेने निघून गेले.

रात्रीच्या अंधारात हा प्रकार घडल्याने ते खूप घाबरुन गेले होते. रस्त्यावर कोणीही वाहने थांबत
नव्हते. एक क्रेनचालक थांबला. त्याने भोंगे यांना टोलनाक्यावर सोडले. तेथे त्यांनी आपल्यावरील
आप बीती सांगितल्यावर तेथील पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला.

त्यांना नेमके कोठे पिस्तुल दाखवून कॅब पळवून नेली हे पाहिल्यावर ती हद्द कामशेत पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील असल्याने कामशेतमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. कॅबचालकाला लुबाडून
कॅश चोरुन नेल्यानंतर प्रथम टोलनाका, तेथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तेथून कामशेत
पोलीस ठाणे या सर्व प्रकारात तब्बल चार तास निघून गेले होते. कामशेत पोलिसांनी केलेल्या
तपासात खालापूर टोलनाक्यावरुन कॅब घेऊन हे चोरटे मुंबईच्या दिशेने गेले असून पोलिसांचे एक
पथक मुंबईला तपासासाठी गेले आहे.

Web title : pune crime ola uber driver steals cab nelly at gunpoint the thieves reached mumbai till the complaint was filed

हे देखील वाचा :

Pune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

School Fee | खासगी शाळांच्या शुल्कात 15 % कपातीच्या निर्णयाविरूध्द संस्थाचालक न्यायालयात जाणार

Raj Thackeray | ‘चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, बैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही’

Pimpri Crime | कलयुग ! महिलेनं स्वतःच्याच अल्पवयीन मुलीला लावलं ‘धंद्या’ला, सेक्स रॅकेटसोबत गांजाची विक्री; महिलेसह अश्लील चाळे करणारे ‘गोत्यात’

Related Posts