IMPIMP

Pune Crime | बारामतीत पिळदार शरीरयष्टीसाठी इंजेक्शन विकणारा ‘गोत्यात’

by nagesh
Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी रक्त पुरवठा नियंत्रित (Regulating blood supply) करणारी इंजेक्शन (injection) अवैध पद्धतीने जिममध्ये विकाणाऱ्या एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई बारामती पोलिसांनी (Baramati Police) केली आहे. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप सुरेश सातव Pradip Suresh Satav (रा. कसबा, बारामती) या आरोपीला ताब्यात (Pune Crime) घेतले आहे.

आरोपी जीम करणाऱ्या लोकांनी शरीर पिळदार होते, असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना (Pune Crime) मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चारचाकी गाडीसह (एमएच 02 डी.झेड 7286) पकडून त्याची व गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीत एकूण 20 इंजेक्शन बॉटल मिळून आले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जप्त करण्यात आलेले इंजेक्शन हे सर्जरी (Surgery) केल्यानंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यसाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केल्यानतंर सुस्ती न येण्यासाठी केला जातो. सदरचे औषध हे शरीरावर दुष्परिणाम करणारे औषध असल्याचे निरीक्षकांनी सांगितले. हे औषध कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसून ते बारामतीमधील जिमला विकले जात होते. पोलिसांनी व औषध निरीक्षक (Drug inspector) प्रशासनाने तात्काळ कारवाई करुन हे औषध जप्त केले आहे.

आरोपी सातव याच्याकडून 268 रुपये प्रमाणे 20 बॉटल्स अंदाजे 5 हजार 360 रुपये तसेच 9 लाख किमतीची
चारचाकी असा एकूण 9 लाख 35 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.
तसेच हे औषध त्याने कोठून आणले व अजून कोणाकोणाला विकले आहे याचा सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील (API Ganesh Patil) करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक (Police Inspector Sunil Mahadik), गणेश पाटील, युवराज
घोडके, संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र कांबळे, दशरथ कोळेकर, अजित राूत, दशरथ इंगोले, सचिन कोकणे,
मनोज पवार यांनी केली.

Web Title: Pune Crime | one arrested for selling injections toned bodies arrested in baramati

हे देखील वाचा :

Online Video Game | ‘ऑनलाइन गेम’मूळ आयुष्य गमावलं ! रुळावर बसून खेळत होते ‘गेम’, रेल्वे धडकल्यानं युवकांचे झाले ‘तुकडे-तुकडे’

Gold Price Today | सलग 3 दिवसांपासून घसरतोय सोन्याचा दर, जाणून घ्या 1 तोळ्याचा भाव

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Related Posts