IMPIMP

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडचा आणखी एक ‘कारनामा’ ! बंदुकीतून 3 गोळ्या झाडून जबरदस्तीने ‘मर्सिडीज’ केली नावावर

by nagesh
Pune Crime | criminal nanasaheb gaikwads locker full 1 crore gold and 50 lakh cash and other things come out

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | लोकांना पठाणी पद्धतीने व्याजावर पैसे देऊन त्यांची जमीन, फ्लॅट, गाड्या जबरदस्तीने स्वत:च्या नावावर करुन घेणे, प्रसंगी त्यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या नानासाहेब गायकवाड याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने दरमहा ४ टक्के व्याजाने दिलेल्या पैसे वसुल केलेच शिवाय मर्सिडीज कार जबरदस्तीने नावावर करुन घेतली. पैसे दिल्यानंतर गाडी परत मागणार्‍या गाडीमालकावर बंदुकीतून 3 गोळ्या झाडल्या. पोलिसांनी गायकवाड कुटुंबियांवर कारवाई (Pune Crime) केल्यानंतर आता अनेक तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी पिंपळे निलख येथील एका 37 वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. हा प्रकार 2017 ते 2021 दरम्यान घडला. फिर्यादी याने नानासाहेब गायकवाड
याच्याकडून दरमहा 4 टक्के व्याजाने 29 लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याज ते दरमहा गायकवाड
याच्या घरी जाऊन देत होते. असे असताना गायकवाड हा त्यांच्या घरी आला व मुद्दल दिली नाही या
कारणावरुन सिक्युरिटी म्हणून त्यांची मर्सिडीज बेंज कार घेऊन गेला. त्यानंतर सहा महिन्यांनी मुद्दल
दिली नाही त्यामुळे आरोपीने फिर्यादीला बोलावून गाडीचे कागदपत्रे, आवश्यक कोर्‍या टी टी फॉर्म व
25 लाख रुपयांच्या चेकवर फिर्यादीच्या सह्या घेतल्या.

त्यांची मर्सिडीज कार दीपा नानासाहेब गायकवाड यांच्या नावावर   करुन घेतली.  मार्च 2019 मध्ये आरोपीने त्यांच्या बंगल्यावर बोलावून जबरदस्तीने फिर्यादीला मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. नानासाहेब गायकवाड याने त्याच्याकडील बंदुकीतून 3 गोळ्या झाडून धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीचे व्याज व मुद्दल असे 32 लाख रुपये देऊन मर्सिडीज बेंज कार परत मागितल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गायकवाड व त्याचे कुटुंबीय व साथीदारांवर पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यात खंडणी, खुनाचा प्रयत्न, फसवणूक अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. गायकवाड बाप लेकाला न्यायालयाने बुधवारी 27 ऑगटपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title :  Pune Crime | one more crime register on businessman nanasaheb gaikwad of aundh pune

हे देखील वाचा :

Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल ! 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 निरीक्षक, 9 API आणि 11 PSI चा समावेश

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 254 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ

Related Posts