IMPIMP

Pune Crime | ऑनलाईन खरेदी करणे लष्करी अधिकाऱ्याला पडले महागात, सायबर चोरट्यांचा ऑनलाईन गंडा

by nagesh
Pune Cyber Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करण्याचे प्रकार वाढत आहेत. मध्यंतरी एका व्यापाऱ्याला कपड्यांच्या मोबदल्यात 5 पोती चिंध्या पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एका लष्करी अधिकाऱ्यालाच (Military Officer) गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) ऑनलाइन खरेदी केलेली उत्पादने घरपोहोच करण्याची बतावणी करुन 12 हजार रुपयांचा गंडा (Pune Crime) घातला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत प्रमोदकुमार सिंग Pramod Kumar Singh (वय – 43 रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांनी ऑनलाईन पद्धतीने उत्पादन विक्री करणाऱ्या एका संकेतस्थळावरुन काही उत्पादने खरेदी केली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी सिंग यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. (Pune Crime)

चोरट्यांनी घरपोच वस्तू पोहचवण्याची बतावणी सिंग यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांना एनीडेस्क रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर (Anydesk Remote Desktop Software) हे अ‍ॅप डाऊनलोड (App Download) करण्यास सांगितले. सिंग यांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. चोरट्यांनी सिंग यांच्या बँक खात्यातून 12 हजार 198 रुपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार सिंग यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रियंका शेळके (Police Inspector Priyanka Shelke) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Online shopping is expensive for military officers online gang cheating with him

हे देखील वाचा :

Pune Crime | कुमठेकर रोडवर PMPML बसचा ब्रेक फेल ! 7 ते 8 वाहनांना धडक; 2 ते 3 जण जखमी (VIDEO)

Punit Balan Group Women’s Premier League | 7 वी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा ! हेमंत पाटील ग्रुप, वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघांची विजयी सलामी

Maharashtra Cabinet Decisions | लोहगाव विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षणात बदल, जाणून घ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय

Related Posts