IMPIMP

Pune Crime | पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक; फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा

by nagesh
Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | राज्य राखीव पोलीस दलाच्या (State Reserve Police Force) पोलीस भरतीच्या (Police Recruitment) लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्याने बसविलेल्या उमी उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दौंड एस आर पी एफ ग्रुप ७ चे अधिकारी दत्तात्रय भोंगळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १९ या अहमदनगरमधील कुसडगाव येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०१९ चा विक्रम सोनवणे हा उमेदवार होता.
ही परीक्षा १२ डिसेंबर २०२१ रोजी कसबा पेठेतील (Kasba Peth Pune) आर सी एम गुजराथी कॉलेज (RCM Gujarati High School And Junior College) येथे घेण्यात आली.

या लेखी परीक्षेला विक्रम सोनवणे याने आपल्या जागी डमी उमेदवाराला बसविले होते.
सोनवणे या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
त्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात सोनवणे याने डमी उमेदवार बसवून लेखी परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर भोंगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
हा प्रकार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो फरासखाना पोलिसांकडे (Pune Crime) वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Pune Crime | Police arrest youth for making dummy candidate appear for State Reserve Police Force exams of Police Recruitment Crime at Faraskhana Police Station

हे देखील वाचा :

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

Related Posts