IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 54 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune criminal lodged in Aurangabad Jail for one year CP Amitabh Gupta takes action against 63 people under MPDA Act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibwewadi Police Station) हद्दीत दहशत
पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 54 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सौरभ शरद शिंदे Saurabh Sharad Shinde (वय-20 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. सौरभ शिंदे याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर कारागृहात (Nagpur Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

सौरभ शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीमध्ये तलवार, कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न (Robbery) यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 06 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सौरभ शिंदे याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware), पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 54 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

Web Title : Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta takes action against 54 persons under MPDA Act in last 15 months

हे देखील वाचा :

Amit Deshmukh | कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या 12116 वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत – मंत्री अमित देशमुख

Easy Ways To Reshape Breast | बाळाला स्तनपान दिल्याने बिघडतो ब्रेस्टचा शेप, जाणून घ्या रिशेप करण्याच्या 5 सोप्या पद्धती

Keshav Upadhye | ‘आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या…’ टिपू सुलतान नामकरणावरुन भाजपची शिवसेनेवर खरमरीत टीका

Lata Mangeshkar | लता मंगेशकरांच्या तब्येतीत सुधारणा; वेन्टीलेटर काढण्यात आलं, कुटुंबाने मानले चाहत्यांचे आभार

Related Posts