IMPIMP

Pune Crime | बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या अनिल चव्हाण व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 110 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | टोळीची दहशत आणि वचर्स्व प्रस्थापित करुन बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या अनिल रमेश
चव्हाण व त्याच्या टोळीच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश
दिले. पोलीस आयुक्त यांनी आजपर्यंत 110 आणि चालु वर्षात 47 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टोळी प्रमुख अनिल रमेश चव्हाण (वय-21 रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), राहुल उर्फ मॉन्टी सुनिल कुचेकर (वय-20 रा. बिबवेवाडी), कैलास बाबुराव गायकवाड (वय-21 रा. साईनगर, कोंढवा, पुणे), राहुल अनिल उर्किडे (वय-21 रा. सरगम चाळ, बिबवेवाडी), चिम्या उर्फ प्रशांत भाऊसाहेब घाडगे (वय-21 रा. अंबिकानगर, बिबवेवाडी), धीरज गोपी उर्फ गोपाळ लामिचणे उर्फ लांबीछने (वय-22 रा. काकडे वस्ती, कोंढवा), दोन अल्पवयीन मुले, पाहिजे आरोपी रोहीत बोदरे अशी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. (Pune Crime)

अनिल चव्हाण आणि त्याच्या साथिदारांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दखलपात्र गुन्हे केले आहेत. आरोपींनी बिबवेवाडी परिसरात मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, पोलिसांच्या आदेशाचा भंग, बेकायदेशीर जमाव जमवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव यांनी परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांच्याकडे अनिल चव्हाण आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार टोळी प्रमुख चव्हाण आणि त्याच्या टोळीतील 7 असे एकूण 8 जणांवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कामगिरी अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण,
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर,
सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत डिगे,
सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार बारबोले, पोलीस अंमलदार दैवत शेडगे व अनिल डोळसे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s 110th MCOCA action till date

हे देखील वाचा :

Ajit Pawar – Raj Thackeray | आम्ही दोघे ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे बोलत नाही; अजित पवार राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत

Life Certificate for Pensioners | शेवटचे काही दिवस बाकी, जर ‘हे’ काम नाही केले तर मिळणार नाही पेन्शन

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल

Related Posts