IMPIMP

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेलसह 6 पीडित तरुणींची सुटका

by nagesh
Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | औंधमध्ये स्पाच्या (Spa In Aundh) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution Racket In Aundh) सुरु असल्याचा भंडाफोड सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch Social Security Cell) केला असून एका मॉडेलसह (Model) 6 पिडीत तरुणींची सुटका केली. सीसीटीव्ही वर पोलिसांचा छापा (Pune Crime) पडल्याचे पाहून मॅनेजरने तरुणींसह एसी डक मधून वरच्या मजल्यावर जाऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी (Pune Police) 6 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहायक व्यवस्थापक सुफियान जमालुद्दी अहमद Sufian Jamaluddin Ahmed (वय २३, रा. रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क सोसायटी़ औंध-Aundh) याला अटक केली आहे. स्पा मालक (Spa Owner) वेंकटेश टिपू राठोड Venkatesh Tipu Rathod (वय ३८, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड), स्पा मॅनेजर (Spa Manager) देवीसिंग ऊर्फ लीलाधर शंकरसिंग चव्हाण Devisingh alias Liladhar Shankarsingh Chavan (वय ३०, रा. जयप्रकाशनगर, इंडियन एअर फोर्स स्टेशन, लोहगाव), हाऊस किपिंग गोविंदकुमार Govindkumar (रा. औंध), स्पा फ्लॅट मालक अभिनव रामनाथ वाजपेयी (Abhinav Ramnath Vajpayee) आणि मोना रामनाथ वाजपेयी Mona Ramnath Vajpayee (रा. रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क सोसायटी, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station)  पोलीस उपनिरीखक राकेश न्हाळदे (PSI Rakesh Nhalde) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

औंध परिसरातील द व्हाइट विलो स्पामध्ये (The White Willow Spa) मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. तेथील पिडीत मुलींकडून मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम चार्ज करुन वेश्या व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. त्याने एक्स्ट्रा सर्व्हिससाठी गुगल पेने पैसे दिल्यानंतर त्याने पोलीस पथकाला इशारा केला. यावेळी पोलीस पथक स्पा बाहेर आलेच होते.

काऊंटरवर बसलेल्या सुफीयान अहमद याने काऊंटरवरील संगणकाला जोडलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पोलिसांना पाहिले. त्याने तात्काळ स्पाचा दरवाजा आतून बंद करुन आतील खोलीत पळाला. बनावट ग्राहकाने दरवाजा उघडला. तोपर्यंत सुफीयान अहमद याने, स्वत: व दोन तरुणींना फ्लॅटच्या खिडकीतून एसी च्या डकमध्ये प्रवेश केला. तेथून वरचा मजला गाठून स्पाच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून रिसर्च इन्फोटक सेंटरच्या (Research Infotac Center) आत प्रवेश केला. तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी इन्फोटेक सेंटरच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तेथे वेश्या व्यवसाय करणार्‍या तरुणींनी विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी येथे वेश्या व्यवसाय करणार्‍या तरुणींना शेजारच्या पूजा इमारतीतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोंढून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जाऊन इतर तरुणींची सुटका केली. या कारवाईत एका मॉडेलसह 6 तरुणींची सुटका केली आहे. तेथून 32 हजार 150 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
महिला पोलीस हवालदार शिंदे, मोहिते, इरफान पठाण, पोलीस नाईक हणमंत कांबळे,
कोळगे तसेच परविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांचे एक पथकही या कारवाईत सहभागी झाले होते.

Web Title :- Pune Crime | Prostitution Racket In Aundh under the name of spa center exposed in Pune

हे देखील वाचा :

Pune Crime | तुम्ही ओला इलेक्ट्रिक दुचाकी बुक केली असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी ! डिलिव्हरी देण्याच्या नावाखाली ग्राहकाला 1 लाख 34 हजारांना गंडा

PMSYM Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेंतर्गत निवृत्तीनंतर दरवर्षी मिळेल भरघोस पेन्शन; जाणून घ्या योजना

Pregnant Woman Diet | प्रेग्नंट महिलांनी 1 ते 9 व्या महिन्यापर्यंत काय खावे? आयुर्वेदात ‘हे’ आहेत परफेक्ट डाएट

Related Posts