IMPIMP

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडले

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | माल खरेदी केल्यानंतर एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगून एटीएमजवळ घेऊन गाडीवरुन उतरण्यास सांगून (Pune Crime) पळून जाणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या (Pune Police) हवाली केले. हरीश रामचंद्र वाधवा Harish Ramchandra Wadhwa (रा. काळेपडळ, हडपसर) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी प्रिन्स प्रवीण सोलंकी Prince Praveen Solanki (वय – 21, रा. पांगुळ आळी, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana police station) फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार पेठेतील कोमल गारमेंट मध्ये रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश वाधवा हा प्रिन्स सोलंकी यांच्या कोमल गारमेंट या दुकानात आला. त्यानंतर अंडर गारमेंटचा 17 हजार 885 रुपयांचा माल खरेदी करुन फिर्यादींचा विश्वास संपादन केला. कॅश पैसे काढून देतो, असे सांगून एका अस्पष्ट नंबर असलेल्या दुचाकीच्या पुढील बाजूला त्याने हा माल ठेवला. फिर्यादी यांना मागे बसवून तो एका एटीएमकडे गेला व तेथे पैसे न काढता पुढेच्या एटीएम मधून काढू असे सांगितले. एचडीएफसीच्या (HDFC) एटीएमजवळ त्याने दुचाकी थांबवून फिर्यादी यांना खाली उतरण्यास सांगितले.

फिर्यादी गाडीवरुन उतरले़ मात्र, त्यांनी मागील हँडल धरुन ठेवले होते.
फिर्यादी हे उतरलेले पाहून त्याने अचानक दुचाकी सुरु करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्याच्या बरोबर फिर्यादी फरफटत गेले. त्यामुळे त्यांना खरचटले. तितक्यात समोरुन गाडी आल्याने छोट्या रस्त्यावरुन त्याला पळून जाता आले नाही.
लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. हरिश वाधवा याच्याविरुद्ध अशाच प्रकारे मुंबईत (Mumbai) गुन्हा दाखल आहे.
त्याचे कोंढव्यात दुकान आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Pune Crime Faraskhana police station Arrest Criminal

हे देखील वाचा :

Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यांकडून 20 किलो गांजा जप्त, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनादिवशी गुन्हे शाखेची कारवाई

Pune Crime | इन्कम टॅक्सच्या नावाने पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरकडे 10 लाखाची खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’, आनंदी झाला करण जौहर; कपूर कुटुंबात उत्सव

Related Posts