IMPIMP

Pune Crime | सराईत गुन्हेगार गणेश चौधरी व अजय विश्वकर्मा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

by nagesh
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हेगारांवर तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश शिवाजी चौधरी (Ganesh Shivaji Chaudhary) व अजय शाम विश्वकर्मा (Ajay Sham Vishwakarma) या दोघांना दोन वर्षांसाठी पुणे (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार (Tadipar) करण्यात आले आहे. आरोपीच्या तडीपारीचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी रविवारी दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपी गणेश चौधरी (वय – 24 रा. कुंजीरवाडी), अजय विश्वकर्मा (वय – 20 रा. म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी) हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने लोणी काळभोर, कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, पुणे-सोलापूर महामार्ग (Pune-Solapur Highway) परिसरात दहशत निर्माण करुन गुन्हे (Pune Crime) केले आहेत. तसेच आरोपीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी आरोपी गणेश चौधरी, अजय विश्वकर्मा यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन रविवारी आरोपींना पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate), पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale),
पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौगुले (PSI Priyanka Chowgule), पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | गेल्या 3 वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; दिला ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

Pune Crime | घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार, लातूरच्या मंगेश पटणेविरूध्द पुण्यात FIR

Related Posts