IMPIMP

Pune Crime | पुणे पोलिसांकडून RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला आश्रय देणार्‍या पुण्यातील वकीलाला अटक

by nagesh
Pune Crime | Ravindra Barhata arrested in Mcoca case at Chathushrungi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | दोन मोक्कासह (MCOCA) Mokka एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेला रवींद्र बर्‍हाटे (rti activist ravindra barate) तब्बल दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. या काळात तो पुण्याजवळच्या परिसरात अधिक काळ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांनी रवींद्र बर्‍हाटे याला आश्रय देणार्‍या वकीलाला अटक (Pune Crime) केली आहे.

सागर संजय म्हस्के adv sagar sanjay mhaske (वय ३२, रा. म्हस्के वस्ती, कळस -आळंदी रोड) असे या वकीलाचे नाव आहे.

रवींद्र बर्‍हाटे (rti activist Ravi Barate) याला लपून छपून राहण्यास मदत केल्याप्रकरणी सागर म्हस्के याला अटक केली आहे. म्हस्के याच्या रुमवर राहून बर्‍हाटे याने व्हिडिओ प्रसारित करुन पोलिसांना आव्हान दिले होते. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात रवींद्र बर्‍हाटेसह 13 जणावंर गुन्हा दाखल आहे. त्यात मोक्का कारवाई करण्यात आली असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख (ACP Surendranath Deshmukh) हे करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तपासात तांत्रिक विश्लेषक करता रवींद्र बर्‍हाटे हा सागर म्हस्के याच्या म्हस्के वस्ती येथील घरात रहात होता, हे निष्पन्न झाले आहे. बर्‍हाटे याला फरार राहण्यास मदत केल्याप्रकरणी अ‍ॅड. सागर म्हस्के याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रवींद्र बर्‍हाटे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक राज्यातील अनेक शहरात गेले होते.
तसेच शेजारील राज्यातही गेले होते.
असे असताना बर्‍हाटे हा पुणे शहराच्या आसपासही अनेक दिवस लपून रहात होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Dr. Ravindra Shisve, Jt CP Pune), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख (ACP Surendra Deshmukh) आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरोपीस अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | Pune police arrests Pune lawyer sagar sanjay mhaske for sheltering RTI activist Ravindra Barate

हे देखील वाचा :

Kabul Airport | काबूल विमानतळाबाहेर 2 स्फोट; 70 जणांचा मृत्यू

Mobile SIM | तुमच्या Aadhar card वरून किती मोबाइल SIM Card आहेत सुरू? ‘टॅफकॉप’द्वारे एका क्लिकवर मिळवू शकता माहिती; जाणून घ्या

Pune Crime | ‘गट्ट्या आव्हाळेला नडतोस काय’ म्हणत टोळक्यांने तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Related Posts