IMPIMP

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch action against 'Public Restaurant and Bar' at Koregaon Park for exceeding the noise limit

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ-मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या हॉटेल आणि पबविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर बुधवारी (दि.23) कारवाई केली आहे. या कारवाई (Pune Crime) पोलिसांनी 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’ मध्ये रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टीम सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले. तसेच या हॉटेलवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

दहा दिवसात 6 हॉटेलवर कारवाई

सामाजिक सुरक्षा विभागाने मागील दहा दिवसांत रात्री उशीरापर्यंत नियमबाह्य पद्धतीने मोठ-मोठ्या आवाजात
साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्या 6 हॉटेलवर कारवाई करुन 11 लाख 39 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टीम
जप्त केले आहे. पोलिसांनी कोंढवा परिसरातील सिल्वर स्पून हॉटेल, विमानतळ परिसरातील 3 मस्केटियर्स,
कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अँन्ड किचन, पब्लिक रेस्टॉरंट अँण्ड बार, बंडगार्डन परिसरातील
मिलर्स लक्झरी क्लब, One8 कम्युन बार यांच्यावर कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे,
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे,
पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch action against ‘Public Restaurant and Bar’ at Koregaon Park for exceeding the noise limit

हे देखील वाचा :

Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे

Winter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा
Vikram Gokhale Health Update | विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Related Posts