IMPIMP

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (दि.12) हडपसर येथील हिंगणे मळा येथील लेबर कॅम्प (Labor Camp) येथे करण्यात आली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून 1 लाख 18 हजार रुपयांची पाच वाहने जप्त केली (Pune Crime) आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आदित्य आत्माराम म्हस्के Aditya Atmaram Mhaske (वय 19, रा. यश दारवेकर शाळा नंबर 32 चे गल्ली नंबर 5 हडपसर, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोन शुक्रवारी ऑल आऊट कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) आणि मनोज खरपुडे (Manoj Kharpude) यांना माहिती मिळाली की, हिंगणेमळा करण बिल्डर यांच्या लेबर कॅम्प येथे एका नंबर नसलेले होंडा शाइन (Honda Shine) गाडीवर दोन जण संशयित रित्या बसले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosari Police Station), चंदननगर (Chandan Nagar Police Station), दौड पोलीस ठाण्याच्या (Daud Police Station) हद्दीतून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 18 हजार रुपये किमतीची 5 वाहने जप्त केली आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर (Senior Police Inspector Sunil Pandharkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, मनोज खरपूडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली.

Web Title : –  Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

हे देखील वाचा :

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

Related Posts