IMPIMP

Pune Crime | पुण्यात घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 4.75 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरासह (Pune City Police) ग्रामीण (Pune Rural Police) हद्दीत घरफोडी (Burglary) आणि वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेवण उर्फ रोहन उर्फ बंटी बिरु सोनटक्के Revan alias Rohan alias Bunty Biru Sontakke (रा. गणपती माथा, वारजे माळवाडी – Warje Malwadi) असे अटक करण्यात आलेल्या (Pune Crime) आरोपीचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

युनिट तीनचे पथक सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतील घरफोडीचा समांतर तपास करत होते. त्यावेळी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार कोथरुड (Kothrud) परिसरात सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर (Santosh Kshirsagar) व ज्ञानेश्वर चित्ते (Dnyaneshwar Chitte) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला (Pune Crime) ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सिंहगड रोड, शिक्रापूर (Shikrapur Police Station), शिरुर (Shirur Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत वाहन चोरी आणि घरफोडीचे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सोन्या – चांदीचे दागिने (Gold – silver jewelry), तीन दुचाकी, कटर असा एकूण 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajit Kumar Patil), पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंबळे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे, प्रकाश कट्टे, दिपक क्षिरसागर, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest One In Two Wheeler Theft Case

हे देखील वाचा :

Amol Mitkari On Sadabhau Khot | अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले – “पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या”

Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका, विशेषत: पवार कुटुंबाकडून…’

Indians Deposit In Swiss Banks | नोटबंदी ठरली कुचकामी ! 14 वर्षात सर्वात जास्त झाला स्विस बँकेत भारताचा पैसा; 2021 मध्ये 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ

Related Posts