IMPIMP

Pune Crime | T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग घेणाऱ्या दोघांना अटक; 4.65 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime) सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी येथील कोंढवा रोडवरील (Bibvewadi-Kondhwa Road) विष्णु विहार अपार्टमेंटमध्ये छापा (raid) टाकून T-20 वर्ल्डकपच्या (T-20 World Cup) अंतिम सामन्यावर बेटिंग (Betting) घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. न्युझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन संघात काल सुरु असलेल्या मॅचवर बेटींग सुरु असताना गुन्हे शाखेच्या (Pune Crime) सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून येथून दोन जणांना अटक केली आहे. तर 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ओंकार राजु समुद्रे Omkar Raju Samudre (वय-25 रा. हुडको कॉलनी, ता. शिरुर सध्या रा. विष्णु विहार अपार्टमेंट, बिबवेवाडी, कोंढवा रोड, पुणे)
व निकित अजित बोथरा Nikit Ajit Bothra (वय-26 रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर, सध्या रा. भिमाली कॉम्पलेक्स जवळ सॅलिसबरी पार्क, मार्केटयार्ड)
अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
आरोपींविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील कोंढवा रोडवरील विष्णु विहार अपार्टमेंटमध्ये न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग सुरु असल्याची माहिती पोलिसांना (Pune Police Crime Branch) मिळाली
. त्यानंतर पोलिसांनी विष्णु विहार अपार्टमेंटमधील ए 5, फ्लॅट नं. 4 येथे छापा मारला.
त्यावेळी ओंकार आणि निकेत हे दोघे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल व लॅपटॉवर सट्टा घेताना मिळून आले.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात (Pune Crime) घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप असा एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Senior Inspector of Police Shilpa Chavan), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके
(Sub-Inspector of Police Shridhar Khadke), महिला पोलीस अंमलादार शिंदे, पुकाळे, माने, मोहिते, कांबळे, चव्हाण कोळगे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | pune police crime branch arrest Two for betting on T-20 World Cup

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 32 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mutual Funds Sip | 15x15x15 चा फार्म्युला वापरून करोडपती बनने सोपे, वयाच्या 50 व्या वर्षी होऊ शकता 10 कोटीचे मालक; जाणून घ्या

Gold Price Today | लग्नसराईत कमी झाले सोन्याचे दर, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

Related Posts