IMPIMP

Pune Crime | ‘मी गुन्हेगार आहे, मला पोलीस स्टेशनचा काही फरक पडत नाही’; जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघा सावकारांना अटक

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बेकायदा सावकारी करुन गरीबांची पिळवणूक करुन त्यांच्याकडून दामदुप्पट पैसे वसुल करणार्‍या
व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघा सावकारांना (Money Lenders In Pune) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कासीब कदीर कुरेश (वय ३३, रा. साईनाथ वसाहत, गाडीतळ, हडपसर hadapsar) आणि झहीर जुल्फीकार सय्यद Zaheer Zulfiqar Syed (वय ३४,
रा. होळकरवाडी ग्रामपंचायत शेजारी, उरुळी देवाची – Uruli Devachi) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

बेकायदा सावकारी करुन लोकांना छळणार्‍यांविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) मोहीम उघडली आहे. याप्रकरणी माळवाडी (Malwadi
Hadapsar) येथे राहणार्‍या एका ४४ वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९९७/२२) दिली
आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

फिर्यादी यांनी आर्थिक अडचणीमुळे झहीर सय्यद याच्याकडून दरमहा ८ टक्के दराने ५ लाख रुपये घेतले होते. त्यांनी आतापर्यंत ८ लाख ४८ हजार रुपये व्याजाचे व २ लाख रुपये मुद्दल असे १० लाख ४८ हजार रुपये दिले आहेत. तरी देखील आरोपी झहीर सय्यद हा फिर्यादीकडे ३ लाख ४८ हजार रुपयांची मागणी करत होता. जर पैसे दिले नाहीत तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी (Threat) दिली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणीविरोधी पथकाकडे (Anti Extortion Cell, Pune) संपर्क साधला. त्यांनी झहीर सय्यद याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सजगणे (Assistant Police Inspector Sajagne) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दुसर्‍या गुन्ह्यात काळेपडळ येथील एका २४ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९९८/२२) दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत घडला आहे.
फिर्यादी कासीब कुरेशी याच्याकडून वेळोवेळी ६ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते.
त्या मोबदल्यात त्यांनी ११ लाख ५० हजार रुपये दिले होते.
तरीही त्यांच्याकडे कुरेशी हा १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करत होता.
पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देऊन “मी गुन्हेगार (Pune Criminals) आहे.
मला पोलीस स्टेशन, दादागिरी गुन्हेगारी याने काही फरक पडत नाही.
मी हे सगळे करुन बसलो आहे, तु जायचे तर जा पोलीस स्टेशनला” अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन खंडणी विरोधी पथकाने कासीब कुरेशी याच्या मुसक्या आवळल्या असून
सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (Assistant Police Inspector Padsalkar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Hadapsar Malwadi

हे देखील वाचा :

Sunil Raut | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणाऱ्यांचा सूड घेणार, ठाकरे गटातील आमदाराचा खळबळजनक इशारा

Sanjay Rathod On Chitra Wagh | संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले – ‘मी आत्तापर्यंत शांत होतो, पण आता…’

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री ?, चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

Related Posts